शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीने केक कापून त्याचे फोटो स्टेट्सला ठेवणाऱ्याला अटक; तलवारी बनविणारा लोहारही जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 22:33 IST

तलवारीने केक कापून त्याचे फोटो स्टेट्सला ठेवणाऱ्याला अटक; तलवारी बनविणारा लोहारही जाळ्यात

पुणे : तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करुन त्याचे फोटो स्टेट्सवर ठेवणारे दोन तरुण आणि त्या तलवारी बनविणारा लोहार अशा तिघांना दत्तवाडी पोलिसांनीअटक केली आहे.रितेश बाळु पायके (वय १९), आदित्य संजय नलावडे (वय १९, दोघे रा. जनता वसाहत) आणि प्रेम योगेश पवार (वय २४, रा. भोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ७ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.शहरात टोळक्यांचा सध्या नंगानाच सुरु आहे. खुन झालेल्या गुंडाचे वाढदिवस पिस्तुल आणि कोयते हवेत नाचवत साजरे केले जात आहे. तलवारी, कोयत्यांनी भर रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरे होत आहेत. त्याचे फोटो व्हॉटसअपवर टाकून परिसरात आपली दहशत माजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अमंलदार विष्णु सुतार, शरद राऊत व राहुल ओलेकर यांना माहिती मिळाली की, काही दिवसांपूर्वी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करुन त्यांचे फोटो व्हॉटसअप स्टेटस ठेवले होते. हे फोटो स्टेटसला ठेवून दहशत निर्माण करणारे दोघे जनता वसाहतीत आले असून त्यांच्याकडे हत्यारे आहेत. त्यानुसार, पोलिसांनी  परिसरात सापळा रचून दोघांना पकडले. त्यांच्याकडून तलवारीदेखील जप्त केल्या. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी या तलवारी त्यांच्या ओळखीच्या भोरमधील लोहार प्रेम पवार याने तयार करुन दिल्याचे सांगितले. तसेच तो आणखी तलवारी देण्यासाठी जनता वसाहतीत आल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करुन लोहार प्रेम पवार याला अटक केली. त्यांच्याकडून एकूण ७ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.रितेश पायके आणि आदित्य नलावडे हे जनता वसाहतीत रहायला असून त्यांना परिसरात दहशत निर्माण करावयाची असल्याने त्यांनी रितेश पायके याचा महिन्यापूर्वी जनता वसाहत डोंगराच्या बाजुला तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. त्याचे फोटो काढून व्हॉटसअप व इतर सोशल मिडियावर लोड केले होते. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर व पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, कुंदन शिंदे, शिवाजी क्षीरसागर, अमित सुर्वे, विष्णु सुतार, शरद राऊत, राहुल ओलेकर, भरत आस्मर, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक