शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित पुण्यात आणखी काही वस्तुंच्या दुकाने सुरु करण्यास परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 12:27 IST

दुकाने सुरु करताना महत्वाची अट म्हणजे व्यवसाय धारक आणि व्यवसायात काम करणारे कर्मचारी हे प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील भागात राहणारे असणे आवश्यक..

ठळक मुद्देइस्त्री, फुटवेअर, स्टेशनरी दुकाने खुलीदुकानामध्ये काम करताना दोन कर्मचाऱ्यांमध्ये फिजिकल डिस्टंन्सिंग बंधनकारक कर्मचाऱ्यांनी हात वेळोवेळी स्वच्छ धुण्यासाठी साबण/ सॅनिटायझरची व्यवस्था करावी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी मिळणार

पुणे : यापूर्वी प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील भागातील आणखी काही वस्तूंच्या दुकानांना व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यात प्रामुख्याने इस्त्री व लॉड्री, स्टेशनरी दुकान, वैद्यकीय साहितय तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे पुरवठा, वाहन दुरुस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी साम्रुगी, फूटवेअर, बांधकाम साहित्य विक्री अशा दुकानांना वारानुसार परवानगी देण्यात आली आहे़.यापूर्वी इलेक्ट्रॉनिक साधने, संगणकीय साहित्य सामुग्री, मोबाईल विक्री व दुरुस्ती इलेक्ट्रिक वस्तू विक्री व दुरुस्ती, भांड्यांची विक्री दुकाने, वाहन दुरुस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिग, बांधकाम साहित्य साधन सामुग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने याच्याशी संबंधित दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. ही दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी मिळणार आहे. यात महत्वाची अट आहे ती म्हणजे व्यवसाय धारक आणि व्यवसायात काम करणारे कर्मचारी हे प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील भागात राहणारे असणे आवश्यक आहे़. दुकानदारांनी कामगारांना फोटोसह ओळखपत्र द्यावे़. दुकानामध्ये काम करताना दोन कर्मचाऱ्यांमध्ये फिजिकल डिस्टंन्सिंग ठेवावे़ दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना मास्क आणि हातमोजे वापरावे़. दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणतीही आजारांची लक्षणे दिसल्यास तात्काळ मनपा दवाखान्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला देऊन त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करावी.  कर्मचाऱ्यांनी हात वेळोवेळी स्वच्छ धुण्यासाठी साबण/ सॅनिटायझरची व्यवस्था करावी व आवश्यक ती सुविधा उपलब्ध करुन द्यावी. दुकानामध्ये शिरताना पायऱ्या आणि बाहेरील भाग १ टक्के सोडियम हायपो क्लोराइट द्रावणाने दररोज फवारणी करावी. दुकानाचे काऊंटर गिºहाईक सोडून गेल्यानंतर १ टक्के हायपो क्लोरट द्रावणाने पूसून द्यावी.  दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकाने देखील मास्क घालणे आवश्यक आहे़.दुकानामध्ये वस्तू खरेदीसाठी गर्दी होऊ नये व सुरक्षित अंतर राहावे म्हणून नागरिकांना उभे राहण्याच्या जागेवर ६ फुट अंतराच्या खुणा करुन ठेवाव्यात.

वस्तू विक्रीसाठी निश्चित केलेले दिवस व्यवसायाचा प्रकार 

*सोमवार-इस्त्री व लॉंड्री दुकान, स्टेशनरी दुकान, वैद्यकीयसाहित्य तयार करण्यासाठी लागणारा कच्चा मालाचा पुरवठा करणारा व्यवसाय.*मंगळवार-     वाहन दुरुस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी सामग्री, तयारफर्निचरची विक्री.*बुधवार  -इस्त्री व लॉंड्री दून, फुटवेअर, टेशनरी दुकान, वैद्यकीयसाहित्य तयार करण्यासाठी लागणारा कच्चा मालाचा पुरवठा करणारा व्यवसाय.*गुरुवार -    वाहन दुरुस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी सामग्री, तयारफर्निचरची विक्री.*शुक्रवार-       इस्त्री व लॉंड्री दुकान, फुटवेअर, बांधकाम साहित्यविक्री, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणारा कच्चा मालाचा पुरवठाकरणारा व्यवसाय.*शनिवार  - वाहन दुरुस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी सामुग्री,इस्त्री व लॉड्री दुकान, बांधकाम साहित्य विक्री, तयार फर्निचरची विक्री.*रविवार-        वाहन दुरुस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी सामुग्री,स्टेशनरी दुकान, फूट वेअर, बांधकाम साहित्य विक्री. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसNavalkishor Ramनवलकिशोर राम