शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील खासगी क्लासेस सुरु करण्यास परवानगी : पालिका आयुक्तांचा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 21:56 IST

सुरक्षित अंतर राखण्यासोबतच दैनंदिन तपासणीच्या सूचना

ठळक मुद्देकोरोना परिस्थितीचा आढावा घेत खासगी शिकवण्या सुरु करण्यास परवानगी

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च रोजी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये खासगी क्लासेसना लागलेले टाळे तब्बल नऊ महिन्यांनंतर उघडण्यात येणार आहेत. महापालिका प्रशासनाने मंगळवारपासून खासगी क्लासेस सुरु करण्यास परवानगी दिली असून पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

केंद्र शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊनमध्ये खासगी शाळा, महाविद्यालये, खासगी आस्थापना, दुकाने बंद करण्यात आली होती. हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली. व्यापारासह सार्वजनिक व्यवहारांवर असलेले निर्बंध हळूहळू उठविण्यात आले. काही दिवसांपुर्वीच शाळा आणि महाविद्यालये उघडण्यासही परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात मुलांच्या ऑनलाईन शाळा सुरु होत्या. त्या अद्यापही सुरु आहेत. शिकवण्या सुरु करण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे शिकवण्यांवर अवलंबून असलेल्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता.

शाळा सुरु झाल्यानंतर आता पालिकेने कोरोना परिस्थितीचा आढावा घेत खासगी शिकवण्या सुरु करण्यास परवानगी दिल्याची माहिती पालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली. शिकवण्या सुरु करताना सुरक्षित अंतर राखण्याचे निकष पाळले जावेत असे स्पष्टपणे बजावण्यात आले आहे. यासोबतच शिक्षकांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक असून शिकवणीमध्ये थर्मल गन आणि ऑक्सिमीटरद्वारे दैनंदिन तपासणी करणेही बंधनकारक आहे. या शिकवण्यांची पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अचानक तपासणी केली जाणार असल्याचे अगरवाल यांनी सांगितले.====काय घ्यावी लागणार काळजी?* सुरक्षित अंतर राखावे लागणार.* शिक्षकांची कोरोना चाचणी बंधनकारक.* थर्मल गन व आॅक्सिमीटरद्वारे तपासणी आवश्यक. 

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणSchoolशाळाcollegeमहाविद्यालयPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या