शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात ६ तर पिंपरीमध्ये ३ नवीन पोलीस ठाण्याला मान्यता : मंत्रालयातील बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 20:23 IST

पिंपरीला २ कोटी, पुणे पोलीस आयुक्तालयाला १ कोटींचा निधी

पुणे : पुणे शहरात नव्याने समाविष्ट गावांसह वाढते शहरीकरण लक्षात घेऊन पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील पोलीस ठाण्यांच्या विभाजनाला मान्यता देण्यात आली. पुणे जिल्ह्यातील वाघोली, ऊरळी कांचन, बाणेर, काळेपडळ, खराडी, फुरसुंगी, म्हाळुंगे, रावेत आणि शिरगाव या नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत सोमवारी (दि. ४) घेण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार अशोक पवार, सुनील टिंगरे, चेतन तुपे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

पुणे पोलीस आयुक्तालयातील तीन झोनचे रुपांतर पाच झोनमध्ये करण्याचा आणि लोणीकाळभोर, वाघोली व लोणीकंद पोलीस ठाण्यांचा पुणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात समावेश करण्याचा निर्णय यावेळी झाला. लोणीकंद पोलीस ठाण्यातून नवीन वाघोली पोलीस ठाणे, लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातून उरळीकांचन पोलीस ठाणे, हवेली पोलीस ठाण्यातून नवीन नांदेड सिटी पोलीस ठाणे, चतु:श्रृंगी व हिंजवडी पोलीस ठाण्यातून नवीन बाणेर पोलीस ठाणे, हडपसर-कोंढवा व वानवडी पोलीस ठाण्यातून नवीन काळेपडळ पोलीस ठाणे, नवीन फुरसुंगी पोलीस ठाणे, चंदननगर पोलीस ठाण्यातून नवीन खराडी तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात म्हाळुंगे, रावेत आणि शिरगाव अशा नवीन पोलीस ठाण्यांना मंजूरी देण्यात आली आहे. पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून पुणे शहर पोलीस आयुक्तालयाला आणि जिल्हा ग्रामीण पोलीसांना वाहन खरेदीसाठी प्रत्येकी १ कोटी तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला २ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

................

हडपसरमध्ये २ नवीन पोलीस ठाणी

हडपसर परिसरात आता २ नवीन पोलीस ठाण्यांना मान्यता देण्यात आली. बैठकीला उपस्थित आमदार चेतन तुपे यांनी सांगितले की, आता हडपसर, काळेपडळ आणि फुरसुंगी अशी तीन पोलीस ठाणी असणार आहेत. वानवडी पोलीस ठाणे, कोंढवा पोलीस ठाणे, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काही भाग मिळून काळेपडळ पोलीस ठाण्याची निर्मिती होणार आहे. तसेच देवाची ऊरळी, वडकी,शेवाळवाडी, मंतरवाडी व लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील काही हद्दीचा समावेश करुन फुरसुंगी पोलीस ठाणे अस्तित्वात येणार आहे........

बावधन पुण्यातचपिंपरी चिंचवड पोलिसांनी बावधन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु, तो सर्व भाग आता पुणे महापालिकेत समाविष्ट झाला असल्याने हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावधन तसेच चतु:श्रृंगी परिसरातील काही भाग मिळून बाणेर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात येणार आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPolice Stationपोलीस ठाणेState Governmentराज्य सरकारAjit Pawarअजित पवारAnil Deshmukhअनिल देशमुख