शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

स्मारकांपेक्षा लाेकांच्या जगण्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा : प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 14:02 IST

खासगी धरणांमधील पाणी वीजनिर्मिती ऐवजी दुष्काळी भागाला देण्यात यावे अशी भूमिका वंचित आघाडीने मांडली.

पुणे : महापुरुषांची स्मारकं गरजेची आहेतच परंतु त्याहीपेक्षा लाेकांच्या जगण्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याचे म्हणत खासगी धरणांमधील पाणीदुष्काळी भागाला देण्यात यावे अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. 

पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. आंबेडकर म्हणाले, राज्यात काही भाग ओला आहे तर काही भाग हा दुष्काळी आहे. राज्यात जशी सरकारी धरणं आहेत तशीच अनेक खाजगी धरणे देखील आहेत. टाटाच्या पाच धरणांमधून वीज निर्मिती केली जाते. सध्या राज्यात विजेचे अतिरिक्त उत्पादन हाेत आहे. विजेची जास्त मागणी असते तेव्हा देेखील अतिरिक्त वीज उरत आहे. त्यामुळे या धरणांमधून करण्यात येणारी वीज निर्मिती टप्प्याटप्प्याने बंद करुन या धरणांमधील पाणी दुष्काळी भागाला देण्यात यावे. टाटा धरणामधील पाणी नद्यांच्या मार्फत उजनी धरणापर्यंत पाेहचवता येईल. तसेच तेथून मराठवाड्यातील विविध भागाला पाणी पुरवता येईल. वंचित सत्तेत आल्यास टाटा ग्रुपशी बाेलून ही याेजना अमलात आणता आणेल असा विश्वास देखील त्यांनी यावेेळी व्यक्त केला. 

तसेच वीज निर्मिती करण्याचे इतर मार्ग असून त्याचा विचार सरकारने करण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तसेच सध्या राज्यात वीजेचा कृत्रिम तुटवडा असून सरकारने इच्छाशक्ती दाखवल्यास वीज सर्व शेतकऱ्यांपर्यंत पाेहचविता येणे शक्य असल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले. पाण्याचे समन्यायी वाटप हे वंचितचे धाेरण असल्याचेही ते यावेळी म्हणाले.  

मुख्यमंत्र्यांनी घाबरुन वंचित विराेधपक्ष असेल असे म्हंटलेमुख्यमंत्र्यांनी वंचित हे विराेधपक्षात असेल असे म्हंटले हाेते, ते त्यांनी वंचितला घाबरुन म्हंटले हाेते. आम्ही विराेधीपक्षात नाहीतर सत्तेत असू असा विश्वास देखील आंबेडकरांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीWaterपाणीdroughtदुष्काळ