शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लोकांचा केंद्राच्या विरोधात राग; लोकसभा त्रिशंकू होणार, एकहाती सत्ता अशक्य-डॉ. कुमार सप्तर्षींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 12:21 IST

भाजपमध्ये ३० टक्के लोकं इतर पक्षांकडून आल्याने पक्षांतर्गत संघर्ष सुरू झालाय

पुणे : ‘‘गेल्या दोन निवडणुकांमध्ये जी लाट होती, ती यंदा नाही. केंद्र सरकारच्या विरोधात लोकांमध्ये राग आहे. त्यामुळे या वेळची लोकसभा त्रिशंकू होईल आणि एकहाती सत्ता येणार नाही,’’ असा दावा ज्येष्ठ गांधीवादी नेते व युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केला.

काॅंग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. सप्तर्षी म्हणाले की, देशात पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. त्याच्या आकडेवारीवरून तर केंद्र सरकारच्या विरोधातील लाट दिसत आहे. इस बार चारशे पार, अशी त्यांनी जाहिरात केली; पण त्यांना चारशे पार जागा हव्यात कशाला? बहुमतापेक्षा अधिक जागा त्यांना हव्यात, हे ऐकूनच धडकी भरते. आपला देश विविध संस्कृतींचा, जातींचा, धर्मांचा आहे. केवळ हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही. खरंतर ‘आरएसएस’ला हिंदू राष्ट्र घडवायचे आहे आणि विशिष्ट विचारसरणीचा माणूस तयार करायचा आहे. जे या देशात शक्य नाही. नागरिकांनी ते होऊ देऊ नये. देशाचे संविधान, लोकशाही वाचविण्यासाठी आता प्रयत्न करणे आवश्यक आहे.’’

डाॅ. सप्तर्षी म्हणाले...

- भाजपमध्ये ३० टक्के लोकं इतर पक्षांकडून आले आहेत. उमेदवार आयात केल्याने पक्षांतर्गत संघर्ष सुरू झाला आहे.- खरंतर भाजपमध्ये कोणी मोठा होऊ लागला की, त्याला मोडीत काढले जाते. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे, शिवराजसिंह चौहान, आदींचा समावेश आहे.- राजकारण म्हणजे व्यापार झाला असून, महाराष्ट्रात त्याचे व्यापारीकरण अधिक झाले आहे. ‘तुम्ही आमच्याकडे या, नाहीतर जेलमध्ये जा’ अशी धमकी देत लोकं आपल्याकडे घेत आहेत. भाजपमधील लोकांना मात्र गप्प बसावे लागत आहेत.

ज्याचा खासदार पुण्यात, त्याचे राज्य केंद्रात 

पुण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची एक परंपरा आहे. पुण्यात ज्या पक्षाचा खासदार होतो, त्याच पक्षाचे सरकार केंद्रामध्ये येते. उदा. सुरेश कलमाडींपासून ते अनिल शिरोळे आणि गिरीश बापट यांच्यापर्यंतचा इतिहास पाहा. यंदा महाविकास आघाडीचा उमेदवार येण्याची शक्यता आहे, असे भाकीत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेKumar Saptarshiकुमार सप्तर्षीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Central Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी