हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यातील जनतेला मिळणार पाणी; २० - २५ वर्षांपासूनची समस्या सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 08:49 PM2021-07-18T20:49:06+5:302021-07-18T20:49:15+5:30

पाणी पुरवठा योजना चांगल्या पद्धतीने नियोजन बद्ध रीतीने शासनाकडे आमदार - खासदार व अन्य लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा करून मंजूर करून आणण्यात काय अडचण होती याचा उलघडा जनतेला झालाच नव्हता

People of Haveli, Daund, Indapur taluka will get water; The problem of 20-25 years will be solved | हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यातील जनतेला मिळणार पाणी; २० - २५ वर्षांपासूनची समस्या सुटणार

हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यातील जनतेला मिळणार पाणी; २० - २५ वर्षांपासूनची समस्या सुटणार

googlenewsNext
ठळक मुद्देपाटबंधारे खात्याला खूप दिवसांनी जाग आल्याने १६ जुलैला सोडून उरुळी कांचन व परिसरातील गावांमध्ये सुरळीत करण्यास मदत

उरुळी कांचन: मुळा मुठा नवा कालवा वाहत असल्याने १६ जुलैपासून हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यातील जनतेला मिळणार असल्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  

मुळा-मुठा उजवा कालवा मागील सुमारे महिन्याभरापासून बंद होता.  त्यामुळे त्यावर आधारित गावांच्या पाणी पुरवठा योजनांना ग्रहण लागून त्या गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत होत्या. पाटबंधारे खात्याला खूप दिवसांनी जाग आल्याने १६ जुलैला सोडून उरुळी कांचन व परिसरातील गावांमध्ये सुरळीत करण्यास मदत केली. 

गेल्या पंधरवड्यापासून उरुळी कांचन गावाच्या अनेक भागात दिवसातून एकदा तर काही भागात एक दिवसाआड ते पण कमी दाबाने तर काही भागात तीन - दिवसांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता . उरुळीची असणारी लोकसंख्या व वाढ होणारी लोकसंख्या याला लागणारी कायम स्वरुपाची पाणी पुरवठा योजना चांगल्या पद्धतीने नियोजन बद्ध रीतीने शासनाकडे आमदार - खासदार व अन्य लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा करून मंजूर करून आणण्यात काय अडचण होती. याचा उलगडा गेल्या अनेक वर्षांपासून उरुळी कांचनच्या सर्वसामान्य जनतेला अद्याप तरी काही होत नव्हता. 

उरुळी कांचन गावाची पिण्याच्या पाण्याची सोय सध्यातरी पूर्णपणे मुळा-मुठा उजवा कालव्यावर अवलंबून आहे. पण कोणीही राज्यकर्ते झाले तरी या बाबतीत ठोस व जनतेच्या उपयोगाचा निर्णय घेत नाही. हीच या गावाच्या नागरिकांची पिण्याच्या पाण्याबाबतची गेल्या २५ - ३० वर्षांपासूनची समस्या आहे. जनता पिण्याच्या पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्याला त्रासली असून आणखी किती दिवस योग्य दाबाने व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची वाट पुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर नव्हे. तर पुण्याचे उपनगर होऊ पाहत असलेल्या उरुळी कांचनने बघायची असा सवाल जनतेकडून उपस्थित केला जात आहे.

Web Title: People of Haveli, Daund, Indapur taluka will get water; The problem of 20-25 years will be solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.