शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

महापालिकेच्या शाळांमध्ये ‘शिपाई’च क्रीडा शिक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 21:12 IST

महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे मुळे क्रीडा शिक्षकांची नियुक्तीच करण्यात आली नसून, सध्या शाळांतील शिपाई च क्रीडा शिक्षक झाले असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्दे२२ पदे रिक्त :सध्या एकही क्रीडा शिक्षक नाही पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शहरामध्ये तीन अनिवासी क्रीडा निकेतन सुरु

पुणे: शहरामध्ये आॅलिंपिक दजार्चे खेळांडू तयार व्हावेत यासाठी उत्कृष्ट सुविधा व तांत्रिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून क्रीडा निकेतनच्या शाळा सुरु केल्या. परंतु महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे मुळे क्रीडा शिक्षकांची नियुक्तीच करण्यात आली नसून, सध्या शाळांतील शिपाई च क्रीडा शिक्षक झाले असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील खेळांडूना स्थानिक पातळीवर खेळासाठी उत्कृष्ट सुविधा व तांत्रिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शहरामध्ये तीन अनिवासी क्रीडा निकेतन सुरु करण्यात आली. पुणे शहरामध्ये चांगल्या दर्जाचे  खेळांडू तयार होण्यासाठी महापालिकेच्या वतीने दर वर्षी या क्रीडा निकेतन शाळांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. या क्रीडा निकेतनच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत नाष्टा, जेवण, दूध, फळे उपलब्ध करुन दिली जातात. या क्रीडा निकेतनच्या शाळांमध्ये त्याच दजार्चे प्रशिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने मानधनावर क्रीडा शिक्षकांची नियुक्ती केली जाते.     यंदाचे शैक्षणिक वर्षे सुरु होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप मानधनावर क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. महापालिकेच्या चार क्रीडा निकेतन शाळांसाठी २२ क्रीडा शिक्षकांची गरज असून गेल्या तीन महिन्यांपासून एकही क्रीडा शिक्षक उपलब्ध नाही. यामुळे शाळांमधील शिपाईच क्रीडा शिक्षकांची भूमीका पार पडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याबाबत मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वच सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.हा प्रकार समोर आल्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी तातडीने क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले.

--------------महापालिकेच्या क्रीडा निकेतन शाळाशाळेचे नाव                                       विद्यार्थी संख्या         प्रशिक्षणखाशाबा जाधवक्रीडा निकेतन, सिंहगड रोड              १८६                      कबड्डी, खो-खो,                                                                                    मल्लखांब, योग, कुस्तीसचिन तेंडूलकर क्रीडा निकेतनहडपसर                                              २२८                    हॅन्डबॉल, थ्रोबॉल, योगा, मल्लखांब, कुस्ती, अ?ॅथलॅटिक्स        क्रीडा निकेतन शाळा, येरवडा             ११०                   बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, योग, कुस्ती    ------------------शहरामध्ये महापालिकेच्या वतीने ३१ जलतरण तलाव व ११ बॅडमिन्टन हॉल बांधण्यात आले असून, हे सर्व टेंडर काढून खाजगी संस्थांना चालविण्यास देण्यात येतात.-------------क्रीडा धोरण कागदावरच शहरामध्ये क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण आवश्यक आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने सन २०१३ क्रीडा धोरण जाहीर केले. शहराचे स्वतंत्र क्रीडा धोरण करणारी देशातील पहिली महापालिका असा टिमका मिरवणा-या पुण्याचे क्रीडा धोरण प्रत्यक्ष केवळ कागदावर राहीले आहे. आता पुन्हा नव्याने सुधारित क्रीडा धोरण २०१८ निश्चित करण्यात आले असून, क्रीडा समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSchoolशाळाTeacherशिक्षक