शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

अचानक विमानाच्या वेळेत बदल करणा-या जेट एअरवेजला ग्राहक मंचाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 16:59 IST

येत्या ४५ दिवसांत ग्राहकाला तिकीटाचे व नुकसान भरपाई म्हणून ३५ हजार १९० रुपये परत करावे, असे आदेश ग्राहक मंचाने दिले आहे.

ठळक मुद्देपुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते श्रीनगर अशा दोन टप्प्यात विमानाने जात

पुणे : तिकीट बुक झालेल्या विमानाची वेळ अचानक बदलल्याने तिकीटाची रक्कम परत देण्यास मनाई करणा-या जेट एअरवेजला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. येत्या ४५ दिवसांत ग्राहकाला तिकीटाचे व नुकसान भरपाई म्हणून ३५ हजार १९० रुपये परत करावे, असे आदेश मंचाने दिले आहे. मंचाचे सदस्य अनिल जावळेकर आणि एस. जी. दुनाखे यांनी हा निकाल दिला.         या प्रकरणात नऊतेज सिंह (चेतना अपार्टमेंट, ईस्ट स्ट्रीट) यांनी जेट एअरवेज विरोधात ग्राहक मंचात तक्रार दिली होती. तक्रारदार हे कायम पुणे ते श्रीनगर असा प्रवास करीत. त्यासाठी ते पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते श्रीनगर अशा दोन टप्प्यात विमानाने जात. त्यांनी २७ फेब्रुवारी २०१६ रोजी १५ जुन २०१६ ला सकाळी  ७ वाजून ३५ मिनिटांनी दिल्लीला निघणारे जेट एअरवेजच्या विमानाचे तिकीट बुक केले होते. तक्रारदार नेहमीचे ग्राहक असल्याने कंपनीने त्यांना १८ हजार २२५ रुपयांचे तिकीट सवलत देवून १४ हजार २४९ रुपयांत बूक केले. दोन वेळा तिकीट कन्फॉर्म झाल्यानंतरही अचानक त्यांना विमानाची वेळी बदलण्यात आल्याचे सांगितले. ७ वाजून ३५ मिनिटांनी निघणारे विमान आता ५ वाजून ३० मिनिटांनी निघेले असे जेट एअरवेजकडून सांगण्यात आले. मात्र वयोव-द्ध असल्याने बदललेल्या वेळेत जाणे शक्य होणार नाही, असे त्यांनी जेट एअरवेज कळले. मात्र त्यांचा सकारात्मक प्रतिसाद न आल्याने त्यांनी दुस-या कंपनीचे तिकीट बुक के ले व बुक केलेल्या तिकीटीचे पैसे परत करण्याची जेट एअरवेजकडे मागणी केली होती.        दरम्यान जेट एअरवेजकडून त्यांना कळविण्यात आले की, तुम्ही बुकींग केलेल्या वेळेनुसार म्हणजे ७ वाजून ३५ मिनिटांनीच निघणार आहे. पण त्यापुर्वीच तक्रारदार यांनी दुसरे तिकीट बुक केले होते. वेळोवेळी रिफंटची मागणी करूनही पैसे न मिळाल्याने तक्रारदारांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. तिकीटीचे १० हजार १९० रुपये आणि नुकसान भरपाई व व्याज मिळून ६० हजार १९० रुपये मिळण्याची मागणी केली होती.  दोन्ही बाजुंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने जेट एअरवेजसा आदेश दिले की, ९ टक्के व्याजासहीत तिकीटाच्या रक्कमेचे १० हजार १९० रुपये, २० हजार रुपये नुकसान भरपाई, ५ हजार रुपये तक्रारखर्च निकालापासून ४५ दिवसांत तक्रारदारांना परत करावे. 

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीJet Airwaysजेट एअरवेजCourtन्यायालय