पिंपळवंडी येथे बिबट्याने केला दुचाकींचा पाठलाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 00:48 IST2019-02-09T00:48:27+5:302019-02-09T00:48:40+5:30

पिंपळवंडी-उंब्रज रस्त्यावर गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून पिंपळवंडीमार्गे काळवाडीकडे जाणाऱ्या दांपत्याचा बिबट्याने पाठलाग केला. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले.

Peeplewandi chase the two-wheelers by leopard | पिंपळवंडी येथे बिबट्याने केला दुचाकींचा पाठलाग

पिंपळवंडी येथे बिबट्याने केला दुचाकींचा पाठलाग

पिंपरी पेंढार : पिंपळवंडी-उंब्रज रस्त्यावर गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून पिंपळवंडीमार्गे काळवाडीकडे जाणाऱ्या दांपत्याचा बिबट्याने पाठलाग केला. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले.

काळवाडीच्या उपसरपंच नंदा दिनेश बेल्हेकर या पती दिनेश बेल्हेकर यांच्या सोबत काकडपट्टा येथे एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. कार्यक्रम संपल्यांतर ते काळवाडी कडे जात असताना पिंपळवंडी-काळवाडीच्या मध्ये असलेल्या ओढ्याच्या शेजारील ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने
त्यांचा पाठलाग केला.यावेळी दिनेश बेल्हेकर यांनी मोटारसायकलचा वेग वाढवला. बिबट्याच्या हल्ल्यातून बेल्हेकर दांपत्य थोडक्यात बचावले.त्यांच्या मागोमाग असलेल्या दुचाकींचा देखील बिबट्याने पाठलाग केला.

या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन लवकरात लवकर वनविभागाने पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Peeplewandi chase the two-wheelers by leopard