शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकने धडक दिल्याने पादचारी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 21:09 IST

एका ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक पादचारी गंभीर जखमी झाला असून हा अपघात सोमवारी रात्री बाराच्या सुमारास मुंबई - बंगळुरू महामार्गावरील वडगांव बुद्रुक येथील हॉटेल मुरली व्हेजसमोर झाला.

पुणे (नऱ्हे ): एका ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक पादचारी गंभीर जखमी झाला असून हा अपघात सोमवारी रात्री बाराच्या सुमारास मुंबई - बंगळुरू महामार्गावरील वडगांव बुद्रुक येथील हॉटेल मुरली व्हेजसमोर झाला. अपघातानंतर ट्रकसह चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .याप्रकरणी पोलीस हवालदार घनश्याम निगडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई - बंगळुरू महामार्गावरील वडगांव बुद्रुक येथील हॉटेल मुरली व्हेजसमोरील रस्त्यावरून रात्री बारा वाजणेच्या सुमारास उमेशसिंह कल्लुसिंह बोहरा (वय ३८, कोंढवा, पुणे) हे पायी चालत रस्ता ओलांडत होते. त्यावेळेस पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकने (एम एच ०४, एच वाय  २३९९) जोराची धडक दिली. या अपघातात उमेशसिंह हे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर ट्रकचालक नौशाद इकबाल अन्सारी (वय २६, रा. रामपूर, ता. मधुबन, जिल्हा मऊ, उत्तरप्रदेश) याला घटनास्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतले असून उमेशसिंह यांना ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध हयगयीने, बेदरकारपणे ट्रक चालवून धडक देऊन गंभीररीत्या जखमी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद महांगडे करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातkatrajकात्रजCrime Newsगुन्हेगारी