मोशीत अपघातात दुचाकीस्वार महिलेसह पादचाऱ्याच्या मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 10:55 PM2021-10-13T22:55:57+5:302021-10-13T23:00:02+5:30

किशोर निवृत्ती भोले (वय ३८), असे अपघातात मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.

Pedestrian killed in Moshi accident | मोशीत अपघातात दुचाकीस्वार महिलेसह पादचाऱ्याच्या मृत्यू

मोशीत अपघातात दुचाकीस्वार महिलेसह पादचाऱ्याच्या मृत्यू

Next

पिंपरी : दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका दुचाकीस्वार महिलेसह एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. मोशी येथे हे अपघात झाले. याप्रकरणी वाहन चालकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

किशोर निवृत्ती भोले (वय ३८), असे अपघातात मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. मयत किशोर भोले यांचा भाऊ आप्पासाहेब निवृत्ती भोले (वय ४३, रा. संजय नगर, मोशी) यांनी या प्रकरणी बुधवारी (दि. १३) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत किशोर भोले हे मंगळवारी (दि. १२) रात्री साडेनऊच्या सुमारास पायी चालत घरी जात होते. त्यावेळी पुणे- नाशिक महामार्गावर मोशी येथील गोल्डन पाम सोसायटी समोर अज्ञात वाहनाने किशोर भोले यांना धडक दिली. यात किशोर भोले यांचा मृत्यू झाला. 

अपघाताच्या दुसऱ्या घटनेत रंजना नामदेव काकड (वय ४०) या महिलेचा मृत्यू झाला. बाळासाहेब भास्कर उगलमुगले (वय २६, रा. शिवाजीवाडी, मोशी) यांनी या प्रकरणी बुधवारी (दि. १३) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कंटेनर चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रंजना काकड या त्यांचा जावई फिर्यादी बाळासाहेब उगलमुगले यांच्यासोबत बुधवारी (दि. १३) दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी मोशी येथील भारत माता चौकात ते सिग्नलला थांबले असताना आरोपीच्या कंटेनरने फिर्यादीच्या गाडीला धडक दिली. त्यामुळे फिर्यादीच्या गाडीवरील फिर्यादीची सासू रंजना काकड खाली पडल्या. यात त्यांच्या डोक्याला मार लागून त्या जखमी झाल्या. यात रंजना काकड यांचा मृत्यू झाला.

Web Title: Pedestrian killed in Moshi accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app