शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पालखीला शांत अन् मंगलमय वातावरण; मग गणेशोत्सवात DJ चा दणदणाट का? ज्येष्ठांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 16:46 IST

ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, याचाही आपण गांभीर्याने विचार करावा, ज्येष्ठांचा थेट मुख्यमंत्री शिंदेंना इशारा

पुणे: संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा लाखो वारकऱ्यांसह शहरात येतात, मुक्कामी राहतात अन् शांततेत मार्गस्थ होतात. कोठेही ध्वनिप्रदूषण हाेत नाही, वाहतूककोंडी नाही, धांगडधिंगा नाही, अशा अतिशय शांत व मंगलमय वातावरण पालखी सोहळा पार पडतो, मग हे सर्व गणेशोत्सवात का होऊ शकत नाही, असा थेट सवालच पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांनी पुण्याचे पाेलिस आयुक्त अमितेश कुमार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. यामुळे गणेशाेत्सवातील ध्वनिप्रदूषणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आळंदी ते पुणे असा २५ किलोमीटर अंतर दहा ते बारा तासांत पार करून पुण्यात मुक्कामास येतात. पुण्यातील गणेशाेत्सवाला मोठी परंपरा आहे. गणेश मंडळांद्वारे तरुणाईला एकत्र करण्यासाठी लाेकमान्य टिळकांनी १८९४ मध्ये गणेशाेत्सव सुरू केला. हा गणेशाेत्सव जगभरात ओळखला जाताे. इतकेच नव्हे, तर परदेशी नागरिकही खास हा उत्सव पाहायला येतात आणि अभ्यासही करतात, परंतु अलीकडच्या काळात या उत्सवाचे स्वरूप बदलत आहे. त्यामध्ये आता डीजेचा दणदणाट वाढलेला आहे. त्यामुळे या उत्सवाला वेगळे वळण लागू पाहत आहे.

मूठभर गणेश मंडळांना खूश ठेवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी बंधनमुक्त गणेशोत्सवाची सुरुवात झाली. त्यामुळे समस्त पुणे किमान दोन महिने वाहतूककोंडी व प्रचंड ध्वनिप्रदूषण यामुळे अक्षरशः हैराण होत असून, दहा दिवस संपूर्ण शहराला वेठीस धरले जात आहे. सध्या त्यात भर पडली आहे ती लेझर लाइट्सची. याला कुठेतरी आवर घालणे आवश्यक आहे, असे दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.डीजे व लेझर लाइटवर कायमस्वरूपी बंदी घाला

प्रत्येक सार्वजनिक सण, वार, उत्सव, जयंती पुण्यतिथी व गणेशोत्सव अतिशय धूमधडाक्यात साजरा व्हायलाच पाहिजे, पण डीजे (स्पीकर) व लेझर लाइटचा वापर न करता हे शक्य आहे. फक्त त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असावी लागते. पुणेकरांच्या वतीने लेझर लाइट व डीजे, यामुळे होत असलेल्या दुष्यपरिणामाबाबत सार्वजनिक मंडळांचे प्रमुख कार्यकर्ते व मंडळप्रमुख यांचे डॉक्टर्स व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून योग्य प्रबोधन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

पाेलिसांचा विचार नाही

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीस जेमतेम तीन ते चार किलोमीटरचे अंतर पार करण्यास ३० ते ३२ तास लागतात, असे का? या सर्व उत्सवात पोलिस खात्याचा तर जरासाही विचार होत नाही. ‘बंधनमुक्त गणेश उत्सव’ या एका वाक्याने कार्यकर्त्यांना बेशिस्त आणि बेधुंद धांगडधिंगा करण्यास मजबूत प्रोत्साहनच मिळाले. पोलिस खाते हतबल झाले.

घरात राहणेही अशक्य

गणेश विसर्जनाच्या दिवशी विसर्जन मिरवणूक मार्गावरील रहिवाशांना तर दोन दिवस घरात राहणेही अशक्य होत आहे. ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, याचाही आपण गांभीर्याने विचार करावा. अशा प्रकारची असंख्य पत्रे आम्ही मुख्यमंत्री व पाेलिस आयुक्तांना पाठवली आहेत. त्यांवर याेग्य निर्णय हाेईल, अशी आमची अपेक्षा आहे. - विलास लेले, पुण्यातील ज्येष्ठ नागरिक

गेल्या वर्षी गणेशाेत्सवात ओलांडलेली आवाजाची पातळी 

पुण्यातील बेलबाग चौकात ११९ डेसिबल आवाज नोंदवला गेला. गणपती चौकात ११६.४, तर कुंटे चौकात ११८.९ डेसिबल ध्वनिप्रदूषण राहिले. उंबऱ्या चौकात ११९.८, तर गोखले चाैकात ११७.३ डेसिबल आवाज नोंदवला गेला. टिळक चौकात ११७, तर खंडुजीबाबा चौकात १२९.८ डेसिबल आवाज नोंदवला गेला हाेता.

गणेशाेत्सवात मिरवणुकीत डीजेचा कर्णकर्कश आवाज सर्वत्र ऐकू येताे. परंतु त्यामुळे लहान मुले, वृद्ध मंडळी यांना याचा खूपच त्रास हाेताे. डीजेच्या भिंती हृदय बंद पाडायच्या बेतात आवाज वाढवतात. उत्सव हा आनंदात साजरा करावा. त्याला घातक व बीभत्स वळण लागू नये. - चंद्रशेखर कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक, पुणे

कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे व लेसर लाइटमुळे ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, महिला, लहान मुले यांना त्रास झाल्याचे समाेर आलेले आहे. तसेच गणेशाेत्सवापूर्वी शहरांत व उपगनरांत ढाेल-ताशांचा सराव करणाऱ्या पथकांमुळेही त्रास हाेताे. त्यामुळे ही सराव परवानगी दाेन महिन्यांऐवजी महिनाआधी द्यावी. - सुनील पाेकरे, ज्येष्ठ नागरिक, सांगवी

किती आवाज हवा?

- केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रहिवाशी क्षेत्रात आवाजाची मर्याद ही ५५ डेसिबल- व्यावसायिक क्षेत्रात आवाजाची मर्यादा ६५ डेसिबल.- कानाला ८० डेसिबलपर्यंतचा आवाज सहन हाेऊ शकताे.- २०२४ मध्ये गणेशाेत्सव मंडळांनी केलेला आवाज १०० डेसिबल

आवाजामुळे हाेणार त्रास

- कानांना कालांतराने बहिरेपणा येताे.- रक्तदाब वाढताे.- हृदयात धडधड हाेते, हृदयविकार हाेण्याची शक्यता वाढते.- डाेके गरगरते, चक्कर येते.

टॅग्स :PuneपुणेGaneshotsavगणेशोत्सवHealthआरोग्यmusicसंगीतpollutionप्रदूषणSenior Citizenज्येष्ठ नागरिकEknath Shindeएकनाथ शिंदे