शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

आर्थिक प्रगतीसाठी सीमेवर शांतता महत्त्वाची : डेव्हीड आर. सिमेलेह; एनडीएचा दीक्षांत समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 5:57 PM

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)चा १३३ तुकडीचा दीक्षांत समारंभ एनडीएच्या सभागृहात पार पडला. आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करा, असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डेव्हीड. आर. सिमेलेह यांनी केले.

ठळक मुद्देभविष्यात लष्करी तंत्रज्ञानात मोठे बदल, येणारा काळ हा आव्हानांचा : डेव्हीड आर. सिमेलेहएनडीएत मिळणारे प्रशिक्षण अतिउच्च दर्जाचे : जसजित सिंग कलेर

पुणे : कुठल्याही देशाला आर्थिक विकास साधायचा असेल, तर त्या देशाच्या सीमांवर शांतता असणे गरजेचे असते. यासाठी सैन्यदल महत्त्वाची भूमिका बजावत असतात. संपूर्ण जगात भारतीय लष्कराची शिस्तबद्ध लष्कर म्हणूण ओळख आहे. बदलत्या काळानुसार नवी आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करा, असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डेव्हीड. आर. सिमेलेह यांनी केले.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)चा १३३ तुकडीचा दीक्षांत समारंभ एनडीएच्या हबिबुल्ला सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सिमेलेह बोलत होते. या प्रसंगी एनडीएचे कमांडन्ट एयर मार्शल जसजीत सिंग कलेर, प्रबोधनीचे उपप्रमुख रिअर अ‍ॅडमिरल एस. के. ग्रेवाल, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश शुक्ला, प्राध्यापक, प्रशिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बॅचलर आॅफ सायन्स विभागातील कमांडन्ट सिल्वर मेडल आणि चिफ आॅफ आर्मी स्टाफ ट्रॉफीचा मानकरी गुरूवंशसिंग गोसाल ठरला. बीएससी कॉप्यूटर सायन्स विभागातील कमांडन्ट सिल्व्हर मेडल आणि चिफ आॅफ नेव्हल स्टाफ ट्रॉफीचा मानकरी अनमोल अग्रहरी तर कला शाखेतील कमांडन्ट सिल्व्हर मेडल आणि चिफ आॅफ एअर स्टाफचा मानकरी राहुल बिष्ट ठरला. तिघांनाही प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते या ट्रॉफी देण्यात आल्या.सिमेलेह म्हणाले, जागतीक पातळीवर अनेक बदल आज होत आहे. आर्थिक विकासासाठी अनेक देश प्रयत्नशिल आहेत. मात्र, सीमेवर शांतता असल्यास आर्थिक विकास वेगाने साधता येतो. ही शांतता राखण्यासाठी सैन्यदल महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतीय लष्कराला प्रतिष्ठा आहे. एक शिस्तबद्ध संघटन म्हणून लष्कर परिचित आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठी चाळणी पार करून विद्यार्थी येथे दाखल झाले आहे. समानतेचे प्रतिक असलेल्या भारतीय लष्करात देशसेवेसाठी या विद्यार्थ्यांनी येथील तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. भविष्यात लष्करी तंत्रज्ञानात मोठे बदल होणार आहे. या मुळे येणारा काळ हा आव्हानांचा असेल. यासाठी नवे बदल स्विकारण्याची तयारी ठेवा, नवी कौशल्य आत्मसात करून स्वत: ला सिद्ध करा. जसजित सिंग कलेर म्हणाले, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संपूर्ण जगातील लष्करी सेवेसाठी अधिकारी तयार करणारी मानाची संस्था आहे. आतापर्यंत देशाच्या तिन्ही दलाला जवळपास ३६ हजार अधिकारी दिले आहेत. तर जवळपास ३० लष्करप्रमुख दिले आहेत. यातील अनेक जन आज लष्कराचे नेतृत्व करत आहेत. या ठिकाणी मिळणारे प्रशिक्षण अतिउच्च दर्जाचे आहे. विद्यार्थ्यांनी तीन वषार्चे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. आता भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्राचार्य डॉ. ओमप्रकाश शुक्ला यांनी प्रमुख पाहूण्यांचा परिचय करून दिला. तर प्रबोधनीचे उपप्रमुख रिअर अ‍ॅडमिरल एस. के. ग्रेवाल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

२५० विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवीराष्ट्रीय संरक्षण प्रबोधनिच्या १३३ व्या तुकडीतील २५० विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी बहाल करण्यात आली. यात बॅचलर आॅफ सायन्सचे ५६,बॅचलर आॅफ  कॉम्प्युटर सायन्सचे १४६ आणि बॅचलर आॅफ आर्ट्सच्या ४८ च्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.  यावेळी विद्यार्थ्यांचे पालक तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून हे सर्व विद्यार्थी पायदळ, वायुदल तसेच नौदलात सेवा बजावण्यासाठी सिद्ध झाले आहेत.

आज रंगणार संचलन सोहळाराष्ट्रीय संरक्षण प्रबोधनिच्या १३३ तुकडीचा संचलण सोहळा पार पडणार आहे. यानंतर हे विद्यार्थी पुढील लष्करी शिक्षणासाठी एनडीएतून बाहेर पडणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून किरगीझ रिपब्लिकचे लष्करप्रमुख रेमबेरडी दुशेनबीएव्ह उपस्थित राहणार आहेत. सूर्यकिरण या विमानांचे प्रात्यक्षिक हे या सोहळ्याचे आकर्षण असणार आहेत.

तीन वर्षांचा काळ आव्हानात्मक लहाणपनापासून लष्करात दाखल होण्याचे स्वप्न होते. आज ते पूर्ण झाले आहे. एनडीएतीन तीन वर्ष खूप आव्हानात्मक होते. सकाळी उठल्यापासून ते दिवस संपेपर्यंत रोज नव्या आव्हानांना सामोरे जावे लागत होते. मात्र, प्रशिक्षणादरम्यान सोबत असलेल्या मित्रांमुळे ही आव्हानांना सामोरे जाऊ शकलो असे, बॅचलर आॅफ सायन्स विभागातील कमांडन्ट सिल्वर मेडल आणि चिफ आॅफ आर्मी स्टाफ ट्रॉफीचा मानकरी गुरूवंशसिंग गोसाल याने सांगितले. गुरूवंश हा पंजाबमधील उपनगर येथील आहे. त्याचे वडील कृषीविभागात अधिकारी आहेत. लष्कराची घरात कुठलीही पार्श्वभूमी नसतांना त्याने हे यश मिळवले आहे. लष्करात आघाडीवर काम करायचे आहे. जम्मू काश्मिर तसेच देशांच्या विविध सीमांवर जवानांची आज गरज आहे. यासाठी पायदळात दाखल होण्याचा निर्णय घेतला असल्याचे गोसाल याने सांगितले.

व्यक्तीमत्वात मोठा बदलएनडीएत तीन वर्षात मिळलेले प्रशिक्षणा दरम्यान खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. शिस्त, अनुशासन आणि वक्तशिरपणा यामुळे व्यक्तीमत्वात मोठा बदल झाल्याचे कला शाखेतील कमांडन्ट सिल्व्हर मेडल आणि चिफ आॅफ एअर स्टाफचा मानकरी राहुल बिष्ट याने सांगितले. देशात दहशतवादाचा प्रश्न गंभीर आहे. तसेच सीमवेवर शत्रुराष्ट्राकडून कुरापती केल्या जातात. या आव्हाहनाला तोंड देण्यासाठी लष्करात जाण्याचा निर्णय राहूलने घेतला आहे. राहूल बिष्ट हा मुळचा देहरादूनचा आहे. त्याचे वडील निवृत्त हॉनररी कॅप्टन असून लष्करात दाखल होण्याचे बाळकडू त्याला त्याच्या वडीलांकडून मिळाले आहे. 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनित शिकण्याचे स्वप्न पूर्णभारतीय लष्कराचे लहाणपणापासून आकर्षण होते. बाबा नौदलात अधिकारी असल्याने त्यांना पाहून लष्करात जाण्याची इच्छा प्रबळ झाली होती. लष्करीशिक्षण हे एनडीएतून घेण्याचे माझे स्वप्न होते ते आज पूर्ण झाले आहे, असे बी. एससी. कॉम्प्यूटर सायन्स विभागातील कमांडन्ट सिल्व्हर मेडल आणि चिफ आॅफ नेव्हल स्टाफ ट्रॉफीचा मानकरी अनमोल अग्रहरी याने सांगितले. अनमोल हा मध्यप्रदेशातील जबलपूर येथील आहे. तीन वर्षाच्या काळात सांघिक जीवन आणि शिस्त या गोष्टी अंगिभूत झाल्या. भविष्यात नौदलात नेव्हीगेशन क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले. 

टॅग्स :nda puneएनडीए पुणेPuneपुणे