पिंपरी : काही प्रभागांमध्ये अत्यंत अनपेक्षित निकाल लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. प्रस्थापित व वजनदार उमेदवारांचा पराभव झाला, तर तुलनेने नवख्या चेहऱ्यांनी बाजी मारली.
प्रभाग ८ मध्ये भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या सीमा सावळे यांना भाजपच्या डॉ. सुहास कांबळे यांनी धक्का दिला. याच प्रभागातून भाजपचेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांना राष्ट्रवादीच्या तुषार शहाणे यांनी कात्रजचा घाट दाखवला.
प्रभाग १६ मधून राष्ट्रवादीचे मातब्बर नेते मोरेश्वर भोंडवे यांना शिंदेसेनेचे शहरप्रमुख नीलेश तरस यांनी धूळ चारली. प्रभाग २० मध्येही लक्षणीय उलथापालथ झाली. राष्ट्रवादी (शरद पवार)च्या सुलक्षणा धर यांचा पराभव करून राष्ट्रवादी (अजित पवार)चे जितेंद्र ननावरे यांनी मागील उट्टे काढले. याच प्रभागात राष्ट्रवादीच्या नवख्या वर्षा जगताप यांनी भाजपच्या महिला शहराध्यक्षा सुजाता पालांडे यांच्यावर विजय मिळवला.
सर्वांत जाएंट किलर ठरल्या प्रभाग २१ मधील राष्ट्रवादीच्या प्रियंका कुदळे. भाजपच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा उषा वाघेरे यांना त्यांनी धूळ चारली. प्रभाग ३२मध्ये दोघा स्थायी समितीच्या माजी अध्यक्षांची लढत झाली. त्यात राष्ट्रवादीच्या अतुल शितोळे यांच्यावर भाजपच्या प्रशांत शितोळेंनी बाजी मारली.
Web Summary : Unexpected PCMC election results saw newcomers defeat established leaders. Key upsets included BJP's Kamble defeating NCP's Sawale, and Tushar Shahane ousting Vilas Madigeri. Nilesh Taras beat Moreshwar Bhondve, while Priyanka Kudale triumphed over Usha Waghere. Prashant Shitole won against Atul Shitole.
Web Summary : पिंपरी चिंचवड चुनाव में अप्रत्याशित नतीजे आए, जहां नए चेहरों ने दिग्गजों को हराया। भाजपा के कांबले ने राकांपा की सावले को, और तुषार शहाणे ने विलास मडिगेरी को हराया। नीलेश तरस ने मोरेश्वर भोंडवे को मात दी, जबकि प्रियंका कुदले ने उषा वाघेरे पर जीत हासिल की। प्रशांत शितोले ने अतुल शितोले को हराया।