लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या दोन्ही राष्ट्रवादीची आघाडीची घोषणा आता येत्या रविवारी होण्याची शक्यता आहे.
दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या सातत्याने बैठका झाल्या. जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा शुक्रवारी होणार होती.
दोन्ही राष्ट्रवादीमध्ये अजूनही काही ठरलेले नाही. अंतिम निर्णय झाल्यानंतर अटी व शर्तींवर विचार होईल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने मागितल्या ४० जागा : पुण्यात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने ३० ते ४० पेक्षा जास्त तर पिंपरी-चिंचवडमध्ये २५ ते ३० जागा मागितल्या आहेत. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडसाठी काँग्रेस, शिवसेना व दोन्ही राष्ट्रवादी अशी आम्ही एकत्रित चर्चा करत आहोत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली.
Web Summary : NCP (Ajit Pawar) and NCP (Sharad Pawar) alliance announcement for Pune Municipal Corporation elections likely Sunday. Seat sharing in final stages, discussions ongoing. Final decision pending; terms and conditions to follow, says Supriya Sule. Sharad Pawar faction seeks 30-40 Pune seats, 25-30 in Pimpri-Chinchwad; joint discussions with Congress, Shiv Sena.
Web Summary : पुणे महानगरपालिका चुनाव के लिए एनसीपी (अजित पवार) और एनसीपी (शरद पवार) गठबंधन की घोषणा संभवतः रविवार को होगी। सीट बंटवारे अंतिम चरण में, चर्चा जारी है। सुप्रिया सुले का कहना है कि अंतिम निर्णय लंबित है; नियम और शर्तें बाद में तय होंगी। शरद पवार गुट ने पुणे में 30-40 सीटें, पिंपरी-चिंचवड में 25-30 सीटें मांगीं; कांग्रेस, शिवसेना के साथ संयुक्त चर्चा जारी।