एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 07:35 IST2025-12-29T07:34:37+5:302025-12-29T07:35:46+5:30
शरद पवार म्हणाले, गौतम अदानी यांचे अनेक क्षेत्रांमध्ये मोठे योगदान आहे. त्यांनी आज लाखो लोकांना रोजगार दिला आहे.

एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
बारामती : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या देशातील पहिल्या अत्याधुनिक महाविद्यालयाचे उद्घाटन बारामतीत उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी उद्योगपती गौतम अदानींसोबतच ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर आले होते.
शरद पवार म्हणाले, गौतम अदानी यांचे अनेक क्षेत्रांमध्ये मोठे योगदान आहे. त्यांनी आज लाखो लोकांना रोजगार दिला आहे. त्यांनी समाजहिताच्या अनेक गोष्टी उभ्या केल्या आहेत. त्यांचे कर्तृत्व नव्या पिढीसाठी सांगणे आवश्यक आहे.
गौतम अदानी अन् माझे नाते बहीण-भावाचे
अजित पवार म्हणाले, गौतमभाईंनी १९८८ साली शून्यातून व्यवसायाची सुरुवात केली. आज त्यांच्या उद्योग समूहाचे २० देशांमध्ये कार्य सुरू आहे. ते तीन लाख लोकांना रोजगार देतात. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ३० वर्षापासून पवार आणि अदानी कुटुंबाचे प्रेमाचे नाते आहे. माझ्यासाठी गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नीचे मोठ्या भावाचे आणि वहिनीचे नाते आहे. उद्याचा भारत कसा असेल, याचा विचार अदानींनी मांडला, त्या विचारांनी पुढे गेल्यास देशातील बेरोजगारी हटविण्यात यश मिळेल, अशी माझी खात्री आहे, असे शरद पवार म्हणाले.