शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत पवार कुटुंबीय एकाच व्यासपीठावर, पण अजित पवार ‘माळेगाव’च्या प्रचारात व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 15:52 IST

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार कुटुंबीय एकत्र येणार असल्याने सर्वांचे या कार्यक्रमाकडे लक्ष होते हे विशेष.

बारामती : विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह संस्थेच्या विविध पदांवर कार्यरत असणारे पवार कुटुंबीय शुक्रवारी (दि. २०) ‘एआय’ कार्यशाळेच्या निमित्ताने एकत्र आल्याचे पाहावयास मिळाले. मात्र, माळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याचे चित्र होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार कुटुंबीय एकत्र येणार असल्याने सर्वांचे या कार्यक्रमाकडे लक्ष होते हे विशेष.

शरद पवार संस्थेचे अध्यक्ष आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, युगेंद्र पवार हे विश्वस्त असल्याने अजित पवार वगळता सर्वजण कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर खासदार सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात गप्पा रंगल्याचे चित्र होते. अजित पवार यांचेदेखील निमंत्रण पत्रिकेत नाव आहे. त्यांनी या ठिकाणी येणे अपेक्षित होते. मात्र, आयोजित एआय कार्यक्रमाला त्यांनी दांडी मारल्याचे दिसून आले. कार्यक्रम टाळत ‘माळेगाव’च्या प्रचारात व्यस्त राहणे त्यांनी पसंत केले. एकीकडे बारामतीत विद्या प्रतिष्ठानचा कार्यक्रम सुरू असताना उपमुख्यमंत्री पवार यांनी माळेगावच्या कार्यक्षेत्रात कार्यकर्ते, मतदारांशी गाठीभेटी घेण्यास प्राधान्य दिल्याचे पाहावयास मिळाले. अनुपस्थितीमुळे अजित पवार यांनी माळेगाव कारखाना निवडणूक गांभीर्याने घेतल्याचे अधोरेखित झाले. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या आखाड्यात उपमुख्यमंत्री पवार हे ‘ब’ वर्गातून स्वत: उतरले आहेत. केवळ स्वत:ची उमेदवारी जाहीर करून ते थांबले नाहीत, तर आगामी पाच वर्षे ‘माळेगाव’चा अध्यक्ष म्हणून आपणच कारभार पाहणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पवार यांनी केली आहे.

अजित पवार यांनी निवडणुकीची सूत्रे हातात घेत स्वत: तळ ठोकून आहेत. अजित पवार आणि गुरू-शिष्य चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. दुसरीकडे शरद पवार गटदेखील माळेगावच्या आखाड्यात उतरला आहे. शरद पवार गटाचे २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार यांनी या निवडणुकीची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यामुळे माळेगावच्या कार्यक्षेत्रातील ३७ गावांचे राजकारण चांगलेच तापले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेSunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवार