पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुरू केलेल्या ‘आपली पीएमपीएमएल’ ॲप प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या पाच महिन्यांत तब्बल १ कोटी १७ लाख ८९ हजार ९५५ प्रवाशांनी या ॲपचा लाभ घेतला असून, त्यातून ६९ लाख ४२ हजार ५१३ तिकीट विक्री, तर २४ लाख २३ हजार ७१२ पास विक्री झाली आहे. त्यामुळे ‘पीएमपी’ला एकूण २० कोटी ८५ लाख २८ हजार ९६३ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
पुणेकरांची जीवनवाहिनी असलेल्या ‘पीएमपी’कडून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि ‘पीएमआरडीए’ परिसरात जवळपास १ हजार ७०० बस संचलनातून प्रवाशांना सेवा दिली जाते. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘पीएमपी’कडून दरवेळी नवनवीन योजना आणि सुविधा पुरविल्या जातात. प्रवाशांना बसचे लाइव्ह लोकेशन कळावे, ऑनलाईन तिकीट किंवा पास काढता यावा, एवढेच नव्हे तर सेवा आणि सुविधेतील त्रुटींबाबत तक्रार करता यावी यासाठी ‘पीएमपी’कडून ‘आपली पीएमपीएमएल’ मोबाइल ॲप सुरू केले. ‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांच्या संकल्पनेतून दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी या नवीन ॲपचे उद्घाटन झाले. अवघ्या दोन आठवड्यांत ३ लाख ४८ हजार ६७८ प्रवाशांनी या ॲपच्या माध्यमातून तिकीट आणि पास काढले. त्यातून ‘पीएमपी’ला ६७ लाख ६२ हजारांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर ॲपच्या माध्यमातून तिकीट व पास घेणाऱ्या प्रवाशांची संख्या कोटीच्या घरात गेली. नोव्हेंबर महिना वगळता दर महिन्याला प्रवासी संख्येत चार ते सहा लाखांनी, तर दीड ते दोन कोटी रुपये उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते, अशी माहिती पीएमपीएमएल प्रशासनाकडून देण्यात आली.
महिना तिकीट विक्री पास विक्री एकूण उत्पन्न
ऑगस्ट १५२८०२ ९७९३८ ६७६२०५५सप्टेंबर ८३७९१९ ३८६१४१ २९७६८६३३
ऑक्टोबर १३६७३३१ ५००३८४ ४२०३७८३२नोव्हेंबर १२१३९०७ ४१४४१७ ३६१२६४६७
डिसेंबर १६७७४५९ ५२३३२५ ४७३८५१३९जानेवारी १६९३०९५ ५०१५१६ ४६४४८८३७
(दि. १ ते २७)एकूण ६९४२५१३ २४२३७२१ २०८५२८९६३