शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

स्मार्ट शहरातील प्रवासी उघड्यावर : तीन हजार थांबे शेडविना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 11:47 IST

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल ३ हजार बसथांबे शेडविना आहेत. यामध्ये काही थांबे मुख्य मार्गांवरीलही आहेत.

ठळक मुद्देअस्तित्वातील थांब्याची दुरावस्था, स्मार्ट सिटीकडे मागणीपीएमपीमार्फत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह लगतच्या भागातही सुमारे ३०० मार्गांवर बससेवाशेड नसल्याने प्रवाशांना उन-पाऊस अंगावर झेलत बसची वाट पाहावी लागत असल्याची स्थिती

पुणे : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील बस प्रवासी वाऱ्यावर सोडण्यात आले आहेत. वातानुकूलित ई-बस ताफ्यात आणून पुणे महानगर परिवहन महामंडळही (पीएमपी) स्मार्ट होणार आहे. पण या बसमध्ये बसवण्यापुर्वी प्रवाशांना हजारो बसथांब्यावर शेड नसल्याने उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे. अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे लोकमत पाहणीत आढळून आले. पीएमपीमार्फत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह लगतच्या भागातही सुमारे ३०० मार्गांवर बससेवा पुरविली जाते. पीएमपी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गांवर सुमारे ४ हजार ६०० बसथांबे आहेत. यापैकी किती थांब्यांवर शेड आहेत, याबाबत मात्र प्रशासनाकडे आकडेवारी नाही. किमान १६०० ते २ हजार थांब्यांवर शेड असण्याची शक्यता आहे. तर उर्वरित तीन हजार थांबे शेडविना असून याठिकाणी शेड उभारून देण्याची मागणी प्रशासनाकडून स्मार्ट सिटीकडे करण्यात आली आहे. थांब्यासाठी महापालिकेकडून जागा उपलब्ध करून दिली जाते. तर पीएमपी प्रशासनाकडून थांब्यांची उभारणी केली जाते. मागील काही वर्षात अनेक लोकप्रतिनिधींना शेड बसविले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात हे प्रमाण वाढले आहे. मात्र, तुलनेने अजूनही अनेक मार्गांवर शेड नसल्याने प्रवाशांना उन-पाऊस अंगावर झेलत बसची वाट पाहावी लागत असल्याची स्थिती आहे. खासदार अनिल शिरोळे यांच्याकडून खासदार निधीतून १०० स्मार्ट बसशेड उभारले जाणार आहेत. पण नंतर या थांब्यांच्या देखभाल-दुरूस्तीचा प्रश्न निर्माण होणार आहे. यापार्श्वभूमीवर लोकमतने विविध मार्गांवरी नव्या-जुन्या बसशेडची पाहणी केली. सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्ता, फर्ग्युसन रस्ता, नेहरू रस्ता, बाणेर रस्ता,कर्वे रस्ता, लक्ष्मी रस्ता, जंगली महाराज रस्ता, केळकर रस्ता, शिवाजी रस्ता या मार्गांवरील अनेक बसथांब्याची दुरावस्था झाल्याचे दिसून आले. तसेच काही प्रमुख रस्त्यांवरील थांबे शेडविना आहेत. -----------------बसशेडची दुरावस्थाविविध मार्गांवरील थांब्यांवर नव्या-जुन्या पध्दतीचे शेड आहेत. अनेक शेडची दुरावस्था झाल्याचे पाहणीत आढलून आले. काही शेडचे छत गंजलेल्या स्थितीत आहे. काही शेड तुटलेले असून प्रवाशांच्या अंगावर पडण्याची भीती आहे. म्हसोब गेट बसथांब्याचे शेड अनेक दिवसांपासून तुटल्याचे प्रवाशांनी सांगितले. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रवाशांना त्याखालीच बसावे लागत आहे. विशेष म्हणजे हे शेड नवीन पध्दतीचे आहे. हीच अवस्था अन्य काही बसशेडचीही झाली आहे. काही बसस्थानकांवरील खुर्च्या तुटलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना शेड असून तिथे बसता येत नाही. काही ठिकाणी पदपथ उखडल्याने शेडमध्ये उभे राहणेही शक्य होत नाही. त्यामुळे अनेक प्रवासी रस्त्यावर उभे राहूनच बसची वाट पाहत भर उन्हात उभे राहिलेले असतात. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना अधिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.------------बसशेडविना थांबेपुणे व पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल ३ हजार बसथांबे शेडविना आहेत. यामध्ये काही थांबे मुख्य मार्गांवरीलही आहेत. कसबा पेठ पोलिस चौकीजवळ प्रवाशांची गर्दी असते. तिथे केवळ बसथांब्याचा फलक आहे. प्रवाशांना पदपथावर ठेवण्यात आलेल्या बाकड्यांवर बसावे लागते. काही ठिकाणी बसण्यासाठी अशी व्यवस्थाही नसल्याने उभे राहूनच बसची वाट पहावी लागत आहे.वेळापत्रक नाहीसंबंधित बसथांब्यावर थांबणाºया बसचे वेळापत्रक त्याठिकाणी असणे अपेक्षित आहे. पण अनेक थांब्यावर असे वेळापत्रक आढळून आले नाही. त्यामुळे प्रवाशांना कोणत्या वेळेत, कोणती बस येणार याची माहिती होत नाही. काही थांब्यावर लावण्यात आलेल्या वेळापत्रकाची दुरावस्था झाली आहे. फलकांवर खासगी जाहिरातीची चिटकविण्यात आल्याने वेळापत्रक गायब झाले आहे. वषार्नुवर्षे हीच स्थिती असल्याचे फलकांकडे पाहल्यानंतर दिसून आले.--------------स्वच्छतेचा अभावबहुतेक बसथांब्यावर अस्वच्छता आढळून आली. काही बसथांबे कचराकुंडी झाल्याचे दिसून आले. परिसरामध्ये ये-जा करणाºया नागरिकांकडून कचरा टाकला जातो. त्याची स्वच्छता केली जात नाही. वसंत टॉकीटसमोरील बसथांब्याजवळ अनेक दिवसांपासून खडीचा ढीग पडलेला आहे. काही भागात उखडलेल्या पदपथांमुळेही बसथांब्याची दुरावस्था झाली आहे. ------थांब्यासमोरच पार्किंगअनेक ठिकाणी दुचाकी किंवा चारचाकी वाहने बसथांब्यासमोर किंवा शेजारीच उभी केल्याची पाहायला मिळाली. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर पुढे येत बसची वाट पाहावी लागते. काही महिन्यांपुर्वी पीएमपी प्रशासनाने बसथांब्यासाठी पिवळे पट्टे मारून बॉक्स तयार करण्याचे काम हाती घेतले होते. पण हे कामही आता थंडावले आहे. थांब्यालगत वाहने उभी असल्याने बसही रस्त्याच्या मधोमध उभ्या राहतात. त्यामुळे वाहतुकीलाही अडथला होत आहे.(लोकमत टीम - राजानंद मोरे, नवनाथ कहांडळ,

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल