शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशाला परत मिळाले ५ तोळे सोने

By admin | Updated: June 10, 2015 05:34 IST

बॅगची तपासणी होते, तेव्हा त्यात तब्बल ५ तोळ्यांपेक्षा सोने निघते..अधिकारी, कर्मचारी मोठ्या कष्टाने संंबंधित प्रवाशाला शोधून काढतात आणि त्याचे दागिने परत देतात.

पुणे : बस क्रमांक १४८... भोसरी ते पुणे स्टेशन..भोसरीमध्ये काही प्रवासी पीएमपी बसमध्ये चढतात..त्यांना पुणे स्टेशनला जायचे असते...स्थानकावर घाई-घाईत उतरताना त्यांच्याकडील एक बॅग बसमध्येच विसरते..पीएमपी वाहक ती बॅग मुख्य कार्यालयात जमा करतो.. जेव्हा बॅगची तपासणी होते, तेव्हा त्यात तब्बल ५ तोळ्यांपेक्षा सोने निघते..अधिकारी, कर्मचारी मोठ्या कष्टाने संंबंधित प्रवाशाला शोधून काढतात आणि त्याचे दागिने परत देतात.एखाद्या चित्रपटाला शोभेल ही घटना...मागील चार दिवस पीएमपी मध्ये सोन्याच्या खऱ्या मालकाचा शोध सुरू होता. सोमवारी मालकाची खात्री पटल्यानंतर, त्याला हे सोने परत देण्यात आले. ज्ञानेश्वर जाधव असे या प्रवाशाचे नाव. ते मूळचे परभणीचे; पण लग्नकार्यासाठी पुण्यात आले होते. दि. ५ जून रोजी ते कुटुंबीयांसह भोसरीत पीएमपी बसमध्ये चढले. त्यांना पुणे स्टेशनला उतरायचे होते. स्टेशनला उतरताना त्यांच्याकडील एक बॅग बसच्या सीटवर विसरून राहते. एक बॅग बसमध्ये राहिल्याचे बसवाहक दत्तात्रय जाधव यांच्या निदर्शनास येते. ते ही बॅग पीएमपीच्या ‘लॉस्ट प्रॉपर्टी’ विभागात जमा करतात. दरम्यान, त्याचदिवशी ज्ञानेश्वर जाधव पीएमपीच्या कार्यालयात बसमध्ये बॅग हरविल्याची तक्रार करतात. मात्र, त्या वेळी विभागाकडे बॅग आलेली नव्हती. त्यामुळे त्यांना बॅग सापडली नसल्याचे सांगण्यात येते.याविषयी पीएमपीचे महाव्यवस्थापक राजेंद्र मदने यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ जूनला पीएमपीतील कर्मचारी व अधिकारी ती बॅग उघडतात. त्यामध्ये त्यांना सोन्याचे दागिने आढळून येतात. त्यानंतर मग या सोन्याच्या मालकाचा शोध सुरू होतो. आदल्या दिवशी कार्यालयात बॅग हरविल्याबाबत तक्रार असल्याचे दूरध्वनी आला होता. त्यानुसार त्या मोबाईल क्रमांकची शोधाशोध सुरू होते. तो क्रमांक ट्रॅप केल्यानंतर संबंधितांना कर्मचारी दूरध्वनी करतात. त्यांच्याकडे बॅगबाबत विचारणा केली जाते. ज्ञानेश्वर जाधव यांना दि. ७ जूनला कार्यालयात बोलविण्यात येते. त्यांच्याकडून बॅगमध्ये असलेल्या वस्तूंची माहिती घेण्यात येते. सोन्याबाबतही विचारपूस केली जाते. दागिन्यांची खात्री पटण्यासाठी त्यांना खरेदीची पावती मागण्यात आली. तसेच, परभणीतील त्यांच्या सराफाकडेही दागिन्यांबाबत खात्री केली जाते. सोमवारी हे दागिने जाधव यांचेच असल्याची खात्री पीएमपी अधिकाऱ्यांना पटते. त्यानंतर जाधव यांना हे परत करण्यात आले. (प्रतिनिधी)