शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

डेक्कन क्वीनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने प्रवाशाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 16:10 IST

साखळी ओढूनही लोणावळा स्थानकात गाडी थांबविण्यात न आल्याने जैन यांना तातडीने उपचार मिळाले नाहीत..

ठळक मुद्देखंडाळा रेल्वे स्थानकात त्यांचा मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात

पुणे : लोणावळा स्थानकातून डेक्कन क्वीनमध्ये चढलेल्या प्रवाशाला लगेचच हृदयविकाराचा झटका आल्याने जागेवरच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. खंडाळा रेल्वे स्थानकात त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.भैरूलाल मोतीलाल जैन (वय ५०, रा. तळेगाव) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. डेक्कन क्वीन पुणे रेल्वे स्थानकातून नियमित वेळेत मुंबईकडे रवाना झाली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही गाडी लोणावळा स्थानकात पोहचली. भैरूलाल जैन यांचे लोणावळा ते मुंबई असे आरक्षण होते. त्यानुसार ते डी१ डब्ब्यामधील आपल्या ३० क्रमांकाच्या आसनाकडे गेले. तिथे बसल्यानंतर त्यांना लगेच छातीत दुखू लागले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने जवळील प्रवाशांना त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डब्यामध्ये दोन डॉक्टर्स प्रवास करत होते. त्यांनीही जैन यांच्यावर प्रथमोपचार केले. पण ते बेशुध्द पडले होते. तोपर्यंत स्थानकातून गाडी पुढे गेल्याने प्रवाशांना आपत्कालीन साखळी ओढून गाडी थांबविली. चालकाने याबाबत माहिती घेऊन रेल्वे स्थानकात संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. पण रेल्वे स्थानक सोडून गाडी काहीशी पुढे जाऊन थांबलेली असल्याने खंडाळा स्थानकाकडे रवाना करण्यात आली. तोपर्यंत रेल्वे डॉक्टरांनी कारने खंडाळा स्थानक गाठले. गाडी तिथे पोहचल्यानंतर तपासणी केली असता जैन यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार जैन यांनी दिली.दरम्यान, साखळी ओढूनही लोणावळा स्थानकात गाडी थांबविण्यात न आल्याने जैन यांना तातडीने उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, रेल्वे अधिकाºयांनी हा दावा फेटाळून लावला आहे. रेल्वे प्रवासी गु्रपच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, साखळी ओढल्यानंतर गाडी लोणावळा स्थानकापासून थोडी पुढे जाऊन थांबली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला दोष देता येणार नाही. रेल्वेमध्ये दोन डॉक्टरही होते. त्यांनीही शर्थीचे प्रयत्न केले पण जागेवर त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले.-------------------- 

टॅग्स :PuneपुणेlonavalaलोणावळाDeathमृत्यूHeart Attackहृदयविकाराचा झटकाrailwayरेल्वे