शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 20:27 IST

चोरट्यांनी प्रवाशाकडील क्रेडीट कार्डचा गैरवापर करून ३ लाख ६८ हजारांची रोकड चोरल्याचे उघडकीस आले आहे. 

ठळक मुद्देपुणे -मुंबई प्रवासातील घटना : क्रेडिट कार्डवरुन काढले पैसे

पुणे : मुंबईला सोडण्याच्या बतावणीने मोटारचालक आणि त्याच्या साथीदारांनी प्रवाशाला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबई-बंगळुरू बाहयवळण मार्गावर ही घटना घडली होती. चोरट्यांनी प्रवाशाकडील क्रेडीट कार्डचा गैरवापर करून खात्यातील ३ लाख ६८ हजारांची रोकड  चोरल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सुधीर जालनापुरे (वय ५९, रा. कोल्हापूर) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालनापुरे कामानिमित्त पुण्यात आले होते. गेल्या महिन्यात २४ जून रोजी ते मुंबईला निघाले होते. सकाळी पावणेसातच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाहयवळण मार्गावरील चांदणी चौकात ते मुंबईकडे जाणाऱ्या वाहनाची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी मोटारचालक आणि साथीदार तेथे आले. त्यांनी जालनापुरे यांच्याकडे मुंबईला निघालो असल्याची बतावणी केली. दादर येथे सोडतो, असे मोटारचालकाने त्यांना सांगितले. त्यानंतर तळेगाव टोलनाक्यापासून काही अंतरावर मोटारचालक आणि साथीदारांनी धावत्या मोटारीत जालनापुरे यांना पिस्तुलाचा धाक दाखविला. त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधली. त्यांच्याकडील क्रेडीट कार्ड आणि अंगठी चोरट्यांनी काढून घेतली.  चोरट्यांनी जालनापुरे यांना दुपारी बाराच्या सुमारास मानखुर्द रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर सोडले. चोरट्यांनी जालनापुरे यांना धमकावून क्रेडीट कार्डचा सांकेतिक शब्द घेतला होता. त्याचा गैरवापर करून चोरट्यांनी जालनापुरे यांच्या खात्यातील ३ लाख ६८ हजार रुपये काढून घेतले. चोरट्यांनी एकूण मिळून ३ लाख ८० हजार ९६० रुपयांचा ऐवज चोरल्याचे उघडकीस आले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाMONEYपैसाPoliceपोलिसhighwayमहामार्ग