शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड एक्स्प्रेसमध्ये पुन्हा प्रवाशाला मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा

By नितीश गोवंडे | Updated: April 26, 2023 17:54 IST

जुने पासधारक रेल्वेमध्ये दादागिरी करून जागा अडवून ठेवतात आणि भांडणे करतात

पुणे : पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसमध्ये जागेवरून नेहमीच वाद होतात. कधी-कधी प्रवाशांमध्ये फ्री स्टाईल मारामारी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मुळात या रेल्वेमध्ये जुन्या पासधारकांची मुजोरी मोठ्या प्रमाणात सुरू असते. अशाच पास धारकांच्या सात जणांच्या टोळक्याने बसण्याच्या कारणावरून एका प्रवाशाला बेदम मारहाण केली. संदीप गोंदेगावे (३७, रा. वरळे, ता. मावळ) असे मारहाण झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी रेल्वेपोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सात प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हे सोमवारी सकाळी सिंहगड एक्स्प्रेसमध्ये लोणावळा येथील नागरिकांसाठी राखीव असलेल्या डब्यात चढले. तेथे एक जागा रिकामी दिसल्याने तेथे त्यांनी बसण्याचा प्रयत्न केला. पण, येथे बसलेल्या प्रवाशांनी त्यांच्या सहकाऱ्यासाठी जागा अडवून ठेवली होती. संदीप यांनी विनंती केली असता, यावेळी त्या सात प्रवाशांनी वाद घालत मारहाण केली. त्यात संदीप यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

दरम्यान, जुने पासधारक रेल्वेमध्ये दादागिरी करून जागा अडवून ठेवतात. तसेच ग्रुपमध्ये बसून पत्त्यांचा डाव मांडतात. यामुळे इतर प्रवाशांना त्रास होतो. नवीन पासधारकांना बसायला जागा देत नाहीत. रेल्वे प्रशासनाने तात्काळ कारवाई करून या जुन्या पास धारकांची मुजोरी मोडीत काढावी, अशी मागणी संदीप यांनी केली.

महिन्यातील पाचवी घटना..

पुणे-मुंबई मार्गावर दररोज सिंहगड एक्‍स्प्रेस, डेक्कन क्‍वीन आणि प्रगती एक्‍स्प्रेस धावतात. कामानिमित्त अप-डाऊन करणाऱ्यांसाठी या तिन्ही रेल्वे सोयीस्कर आहेत. या तिन्ही रेल्वेमध्ये पास धारकांसाठी आरक्षित डबे आहेत. पण, जुन्या पासधारकांकडून नवीन पासधारकांना धमकावणे आणि मारहाणीच्या घटना नेहमी घडत असतात. या महिन्यातील ही पाचवी घटना असून, रेल्वे प्रवास सुरक्षित आहे का ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकpassengerप्रवासी