शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

धुक्यामुळे खोळंबलेल्या विमानाला प्रवासी वैमानिकाचा सहारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 01:11 IST

पुणे विमानतळावरून शनिवारी सकाळी ७.३० वाजता इंडिगो कंपनीचे विमान दिल्लीकडे झेपावणार होते.

पुणे : दिल्लीमधील दाट धुक्यामुळे पुण्याहून दिल्लीला जाणारे विमान बराच काळ धावपट्टीवरच उड्डाणाच्या प्रतिक्षेत होते. वैमानिकाला दाट धुक्यामध्ये विमान उतरविण्याचे प्रशिक्षण नसल्याने दिल्लीतील धुके निवळण्याची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. परंतु प्रसंग ओळखून याच विमानातून प्रवास करणाऱ्या प्रशिक्षित वैमानिकाने कॉकपिटचा ताबा घेऊन उड्डाणाची परवानगी मागितली. ती मिळाल्यानंतर त्याने विमान सुरक्षितपणे दिल्लीत नेऊन उतरविले आणि प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.पुणे विमानतळावरून शनिवारी सकाळी ७.३० वाजता इंडिगो कंपनीचे विमान दिल्लीकडे झेपावणार होते. दिल्लीतील दाट धुक्यांमध्ये हे विमान उतरविण्यासाठी आवश्यक प्रशिक्षणच (कॅट ३ बी) वैमानिकाला नव्हते. त्यामुळे धुके कमी होईपर्यंत विमानाचे उड्डाण होणार नाही, हे स्पष्ट झाले. या संबंधीची उद्घोषणा ऐकून प्रवाशांमधीलच एक जण पुढे सरसावला. त्याने विमान उड्डाणाची परवानगी मागितली.प्रवाशांना हे नंतर कळले. आवश्यक परवानग्या घेऊन कंपनीनेही त्याच्याकडे कॉकपीटची जबाबदारी सोपविली. पण त्याचे ‘फ्लाईट ड्युटी टायमिंग लिमिटेशन’ पूर्ण होत नव्हते. त्यामुळे विमान काही वेळ थांबवून सव्वा नऊच्या सुमारास उड्डाण करण्यात आले.हिवाळ्यामध्ये कमी दृश्यता असलेल्या विमानतळांची विभागणी केलेली असते. त्यानुसार दृश्यतेचे प्रमाण निश्चित करून विमान उतरविण्यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण वैमानिकांना दिले जाते. दृश्यतेच्या प्रमाणानुसार कॅट १,२,३ असे गट केलेले असतात. त्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण असते. कोणतीही कंपनीही प्रवाशांच्या जीव धोक्यात घालून विमान उड्डाण करत नाही. - धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञदिल्ली विमानतळावर शनिवारी सकाळी कमी दृश्यता होती. त्यामुळे येणाºया विमानांचे कॅप्टन ‘कॅट ३बी’ हे प्रशिक्षण पूर्ण केलेले असणे अपेक्षित होते. पण पुण्याहून निघणाºया विमानाच्या कॅप्टनकडे हे प्रशिक्षण नव्हते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून इंडिगोच्या ‘कॅट ३बी’ प्रशिक्षण पूर्ण केलेल्या दुसºया कॅप्टनला ही संधी देण्यात आली. यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या. - इंडिगो एअरलाईन्स

टॅग्स :Puneपुणे