शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

उद्यान अन् मैदानेही कागदावरच..! विकास आराखड्याची अंमलबजावणी केवळ २० टक्के

By राजू हिंगे | Updated: January 15, 2025 13:55 IST

- १ हजार ५९८ पैकी केवळ ३३९ आरक्षणे विकसित

पुणे : शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत उद्यान, मोकळी मैदाने, अग्निशामक दलाची संख्या कमी आहे. त्याचे कारण शहराच्या जुन्या हद्दीच्या १९८७ विकास आराखड्याचा (डीपी) फेरआढावा आणि २३ गावांचा डीपी या दोन्हीमधील १ हजार ५९८ पैकी केवळ ३३९ आरक्षणे विकसित झाली आहेत. भूसंपादनासाठी निधीचा अभाव असल्याने आरक्षणे विकसित होत नाही. परिणामी विकास आराखड्याची केवळ २० टक्केच अंमलबजावणी झाली आहे. त्यामुळे डीपी तयार करताना चर्चा जास्त होते, पण अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे.पुणे महापालिकेची स्थापना १५ फेब्रुवारी १९५० रोजी झाली. त्यावेळी शहराचे क्षेत्रफळ २६ हजार ५४५ एकर आणि लोकसंख्या ४ लाख ८५ हजार होती. महापालिकेने शहराचा पहिला डीपी २० नोव्हेंबर १९५८ ला तयार करण्याचा इरादा जाहीर केला आहे. या डीपीला ७ जुलै १९६६ रोजी राज्य सरकारने मान्यता दिली. या डीपीची अंमलबजावणी १५ ऑगस्ट १९६६ ला करण्यात आली. त्यानंतर या डीपीचे पुनरावलोकन करून १५ मार्च १९७६ रोजी डीपी करण्याचा इरादा जाहीर करण्यात आला. या डीपीला राज्य सरकारने ५ जानेवारी १९८७ ला मान्यता दिली. या डीपीचा २० वर्षांनंतर फेरआढावा घेण्यात येतो. त्यानुसार पालिकेने २३ फेबुवारी २००७ रोजी इरादा जाहीर केला. त्यावर हा डीपी मंजूर करण्यात आला. त्यानंतर २३ गावांचा डीपीही मंजूर करण्यात आला.डीपीमध्ये लोकसंख्येच्या दहा टक्के आरक्षण हे शाळेसाठी आहे. १ हजार लोकसंख्येला चार हजार चौरस मीटरचे मैदान आणि उद्यान आहे. दोन लाख लोकसंख्येमागे एक अग्निशामक केंद्र, २५० व्यक्तींमागे एक बेड असे प्रमाण आहे. त्यानुसार शहराच्या जुन्या हद्दीच्या डीपीत ७९१ आणि २३ गावांच्या डीपीत ८०७ अशी एकूण १ हजार ५९८ आरक्षणे आहेत. त्यातील केवळ ३३९ आरक्षणे विकसित झाली आहेत. डीपी तयार करणे आणि मंजुरीसाठी पाच ते नऊ वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे २० वर्षांच्या नियोजनातील १० वर्षे डीपी तयार करणे आणि मंजुरी मिळण्यात जातात. त्यामुळे डीपीची अंमलबजावणी अत्यंत कमी प्रमाणात होऊन आरक्षणे कागदावरच राहत आहेत.आरक्षणे विकसित करण्यासाठी २० हजार कोटींची गरजडीपीमधील सर्व आरक्षणे विकसित करण्यासाठी तब्बल २० हजार कोटी आवश्यक आहेत. भूसंपादन करण्यासाठी दुप्पट मोबदला द्यावा लागत आहे. एफएसआय आणि टीडीआरपेक्षा रोख मोबदला घेण्याकडे नागरिकांचा कल अधिक आहे. त्यामुळे आरक्षणे विकसित न होण्यामागे भूसंपादनाचा मोठा अडथळा आहे.आरक्षणाचा प्रकार - एकूण आरक्षणे - विकसित आरक्षणेशैक्षणिक - २७८ - ६४आरोग्य -            १६९ -             ३९व्यवसायिक वापर -२१२ -            ३६गहपृकल्प - ७४ -             २०मोकळ्या जागा - ३५६ -             ८९अन्य आरक्षणे - ५०९ -            ९१एकूण - १५९८ -             ३३९ 

भूसंपादन करण्यासाठी दुप्पट मोबदला द्यावा लागत आहे. एफएसआय आणि टीडीआरपेक्षा रोख मोबदला घेण्याकडे नागरिकांचा कल अधिक आहे. भूसंपादनासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पालिकेकडे निधी नाही. त्यामुळे भूसंपादन होत नाही. - प्रतिभा पाटील, उपायुक्त, भूसंपादन विभाग, पुणे महापालिका

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका