लहान मुलाला मारहाण, पालकांची शेजाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 14:54 IST2018-03-28T14:54:09+5:302018-03-28T14:54:09+5:30

१० ते ११ वयोगटातील मुलांमध्ये बागेत खेळत असताना किरकोळ कारणावरून वाद झाले. यातून स्वप्नील भेंडे यांनी लहान मुलाला बेदम मारहाण केली. जखमी मुलास पुढील उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

parent Complaint against neighboring in children hitted case | लहान मुलाला मारहाण, पालकांची शेजाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार  

लहान मुलाला मारहाण, पालकांची शेजाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार  

ठळक मुद्देयाप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.

पुणे : वारजे येथे एकाच सोसायटीत राहणाऱ्या दोन लहान मुलांच्या खेळण्याच्या वादात एकाने ११ वर्षीय लहान मुलाला मारहाण केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी मारहाण झालेल्या मुलाच्या आई शीतल प्रकाश उंबाडपाटील (वय ३६ रा. तेजोवलय सोसायटी,वारजे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात स्वप्नील भेंडे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंबाड पाटील व आरोपी स्वप्नील भेंडे एकाच सोसायटीत मात्र,वेगवेगळ्या इमारतीत राहायला आहे. उंबाड पाटील व भेंडे या दोन्ही कुटुंबातील साधारण १० ते ११ वयोगटातील मुलांमध्ये बागेत खेळत असताना किरकोळ कारणावरून वाद झाले. यात आरोपी स्वप्नील भेंडे व त्यांच्या पत्नीने आपल्या मुलाच्या सांगण्यावरुन घटनास्थळी धाव घेत पाटील यांच्या मुलाला बेदम मारहाण केली. स्वप्नील मारत असताना त्याच्या पत्नीने पाटील यांच्या मुलाला हाताने धरून ठेवले होते. त्यामुळे त्या लहानग्याला प्रतिकारही करता आले नाही. जखमी मुलास पुढील उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पाटील कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती मिळताच भेडेने आपल्या कुटुंबियासह रात्रीच फरार झाल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष निवृत्ती येनपुरे यांनी दिली. भेंडे कुटुंबियांच्या विरुद्धयापूवीर्ही सोसायटीकडे १०-१२ लेखी तक्रारी आल्याची माहितीही येनपुरे यांनी दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास वारजे पोलीस करत आहे.

Web Title: parent Complaint against neighboring in children hitted case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.