पारधी समाजाचे देशासाठी बलिदान- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 01:10 AM2018-09-20T01:10:47+5:302018-09-20T01:11:24+5:30

सूर्यादय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळेचे उद्घाटन

Pardhi community sacrifices for nation- Mohan Bhagwat | पारधी समाजाचे देशासाठी बलिदान- मोहन भागवत

पारधी समाजाचे देशासाठी बलिदान- मोहन भागवत

Next

पुणे : परकीयांच्या आक्रमणाच्या वेळी लढा देणारा हा पारधी समाज आहे. देशासाठी पारधी समाजाने अनेकदा आपले बलिदान दिलेले आहे. ही बाब आपण मात्र विसरलो आहोत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षांनंतर पारधी समाजाबद्दल आपली संवेदना जागृत झाली आहे. आपला धर्म, देश, राष्टÑ, संस्कृती हे एक अखंड शरीर आहे. शरीराप्रमाणे समाजातील प्रत्येक वर्ग हा सबळ, सशक्त आणि सुदृढ व्हावा यासाठी समाजाने प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत />यांनी केले.
भैय्यूजी महाराजांनी सुरू केलेल्या व अमनोरा येस फाऊंडेशनचे माध्यमातून वसतिगृह शाळा उभारणीची जबाबदारी घेतलेल्या सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहांच्या उद्घाटनप्रसंगी सरसंघचालक बोलत होते. अमनोरा येस फाऊंडेशनचे अनिरुद्ध देशपांडे, चंद्रशेखर राठी, दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्टच्या डॉ. आयुषी देशमुख, प्रशांत देशमुख, माधुरी देशमुख उपस्थित होते. आर्किटेक्ट संदीप बावडेकर, ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे, स्ट्रक्चरल इंजिनिअर सादवानी यांचा सरसंघचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या निमित्ताने राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पारधी समाजासाठी काम करणाऱ्या १०० संस्थांच्या पदाधिकाºयांच्या उपस्थितीत विभागीय पारधी परिषद घेण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांचे योगासन प्रात्यक्षिक, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला, मूर्तीकला, शिल्पकला प्रदर्शन, तबला व हार्मोनिअमवादन प्रात्याक्षिक केले. कथ्थक नृत्य सादर केले. अमनोरा येस फाऊंडेशनचे विवेक कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सोमनाथ गोरे यांनी आभार मानले.

शाळेमध्ये मुलांचे-मुलींचे वसतिगृह, भोजनगृह, सर्व १० वर्गात ई-लर्निंगचे प्रोजेक्टर्स, किंडर स्पोर्ट्सकडून मुलांना खेळाचे प्रशिक्षण या सुविधांबरोबरच भविष्यात स्पोर्ट्स अकादमी सुरू करणार असल्याचे तसेच, ग्रामीण भागातील हुशार, गरीब-गरजू, होतकरू विद्यार्थ्यांसाठी सेंटर आॅफ एक्लन्स पुणे येथे पुढच्या वर्षी सुरू करणार असल्याची माहिती अमनोरा येस फाऊंडेशनचे अनिरुद्ध देशपांडे यांनी प्रास्ताविकात दिली.

Web Title: Pardhi community sacrifices for nation- Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.