शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

पानशेत धरणही शंभर टक्के भरले; साखळीतील ४ धरणांतील साठा २६ टीएमसीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 09:48 IST

जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावासाचा चांगला जोर आहे.

ठळक मुद्देचारही धरणांत मिळून २६.३३ टीएमसी (९० टक्के) पाणीसाठा

पुणे : खडकवासला साखळीतील धरण क्षेत्रात पावसाची जोरदार वृष्टी होत असून, खडकवासला पाठोपाठ पानशेत धरणही फुल्ल झाले आहे. साखळीतील चारही धरणांतील पाणीसाठा २६.३३ अब्ज घनफूट (टीएमसी) झाला आहे. पानशेत धरण भरल्याने त्यातून ४ हजार ५५१ क्युसेक्सने पाणी खडकवासल्यात सोडण्यात आले. त्यामुळे खडकवासला धरणातून दुपारी ११ वाजता तब्बल १६ हजार २४७ क्युसेक्सने मुठा नदीत पाणी सोडण्यात येत होते. परिणामी नदीकाठचे रस्ते पाण्याखाली गेले होते. सायंकाळीदेखील धरण क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने त्यातील विसर्ग २० हजार ६८१ क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला. जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावासाचा चांगला जोर आहे. शुक्रवारी सकाळी आठपर्यंत टेमघरला १२३, वरसगाव ११७, पानशेत ९२ आणि खडकवासला धरणक्षेत्रात ३३ मिलिमीटर पाऊस झाला. शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत टेमघर ५६, वरसगाव ३२, पानशेत २७ व खडकवासल्याला ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पानशेत धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने खडकवासल्यातून सकाळी आठ वाजता १३ हजार ९८१ क्युसेक्सने पाणी मुठा नदीत सोडले. पानशेत धरण भरल्यानंतर तेथून विसर्ग सुरू झाल्यानंतर, खडकवासल्यातून १६ हजार २४७ क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात येत होते. खडकवासला साखळीतील वरसगाव धरणात १०.९२ (८५.१९ टक्के), पानशेत १०.६५ (१०० टक्के), टेमघर २.७९ (७५.१७ टक्के) व खडकवासला धरणात १.९७ टीएमसी (१०० टक्के) पाणीसाठा आहे. तर, चारही धरणांत मिळून २६.३३ टीएमसी (९० टक्के) पाणीसाठा झाला आहे. गुंजवणी धरण क्षेत्रात शुक्रवारी सकाळी ८ पर्यंत ८२ व दिवसभरात १४ मिलिमीटर पाऊस झाला. धरणात ३.६२ टीएमसी (९८ टक्के) पाणीसाठा जमा झाल्याने, धरणातून १४०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत होते. वीर धरणात वेगाने पाणी जमा होत असल्याने शुक्रवारी पहाटे ३१ हजार ६८९ क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात येत होते. त्यानंतर सायंकाळी त्यात १३ हजार ९४ क्युसेक्सपर्यंत कपात केली. वीर धरणात ८.७७ टीएमसी (९३.२० टक्के) पाणीसाठा आहे. नीरा देवघर धरण क्षेत्रात दिवसभरात ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात १०.८३ टीएमसी (९२.३६ टक्के) पाणी जमा झाले आहे. भाटघर धरणात २०.३६ टीएमसी (८६.६२ टक्के) पाणीसाठा असून, नाझरे धरणात उपयुक्त पाणीसाठा होऊ लागला आहे. चासकमान धरणात ७.४७ टीएमसी (९८.६६ टक्के) पाणीसाठा झाल्याने, शुक्रवारी दुपारी १०,९१५ क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले.......... 

टॅग्स :PuneपुणेDamधरणRainपाऊसWaterपाणी