शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Pandharpur Wari : यंदाही पालखी सोहळ्यावर कोरोनाचे संकट कायम; उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी घेणार बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 21:53 IST

गतवर्षी कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक पालखी सोहळा रद्द करण्यात आला.

पुणे : पंढरीच्या सावळया विठूरायाच्या भेटीसाठी शेकडो वर्षापासून निघणारी पालखी सोहळ्यावर यंदा देखील कोरोनाचे सावट कायम असून,  या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार येत्या शुक्रवारी बैठक घेण्यात आहे. या बैठकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. 

महाराष्ट्राची अध्यात्मिक परंपरा असलेला पालखी सोहळा दरवर्षी नित्यनेमाने आळंदी आणि देहू मधून पंढरपूर कडे प्रस्थान ठेवतो. वीस दिवसांच्या काळात वाटेवरच प्रत्येक गाव टाळ,मृदूंग आणि अभंगात तल्लीन होते. पंढरपूरात पोहचल्यानंतर आषाढी एकादशी चा सोहळा साजरा होतो. परंतु गत वर्षी कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक पालखी सोहळा रद्द करण्यात आला. कोरोनामुळे गेल्या वर्षभरातील सर्वच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. यंदा देखील संपूर्ण राज्यावर कोरोनाच्या दुस-या लाटेचे गंभीर संकट उभे आहे. या पार्श्वभूमीवर यंदा देखील सार्वजनिक पालखी सोहळा रद्द होणार किंवा कसे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार बैठक घेणार आहेत. 

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी अन्य जिल्ह्यात परिस्थिती अद्याप ही गंभीरच आहे. सध्या संपूर्ण राज्यात लाॅकडाऊन देखील आहे. त्यात सर्वच यंत्रणेकडून कोरोनाची तिसरी लाट यापेक्षा अधिक गंभीर असल्याचे इशारे दिले जात आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता यंदा पालखी सोहळ्याचे स्वरुप काय असेल याचा आढाव घेण्यासाठी उपमुख्यमंत्री बैठक घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारीcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवार