शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

पंढरपूर वारी २०१९ : माऊलींच्या पालखी सोहळा नियोजनासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 19:37 IST

दिंडी समाजाच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला धक्काबुक्की करण्यात आली..

ठळक मुद्देफलटण येथील पालखी तळावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाजाची बैठक

फलटण :  श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी पाच सदस्यीय कमिटी स्थापन करण्यात आली आहे. ही समिती शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे. अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्थ ॲड विकास ढगे पाटील यांनी दिली .      फलटण येथील पालखी तळावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाजाची बैठकीत समिती स्थापन करण्यात आली.    या कमिटीमध्ये सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर , श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचा एक प्रतिनीधी, दिंडी समाजाचे अध्यक्ष मारुती महाराज कोकाटे, राणू महाराज वासकर व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य माऊली जळगावकर यांचा समावेश करण्यात आला आहे .     पालखी सोहळ्यात कोणाला कोणते मान आहेत हे सांगावेत, सोहळ्यात सर्वच मालक होतात,  वाहनाचे व दर्शनाचे पास देतानाही गैरव्यवहार होतो, भागवत संप्रदाय वाढत चालला आहे, तळावर जागा अपुऱ्या पडत चालल्या आहेत. तळ वाढविणे गरजेचे आहे, वारकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या मांडण्यासाठी सासवड , लोणंद व भंडीशेगाव येथे बैठक व्हावी, रथावर प्रमाणापेक्षा अधिक लोक बसतात ते मर्यादित करावेत,  माऊलींच्या पालखी सोहळ्यात इतर पालखी सोहळे चालतात, त्यांना बंदी घालण्यात यावी, सोहळ्याचे नियंत्रण करण्यासाठी वारकरी पोलिसांचे ऐकत नाहीत, त्यासाठी प्रत्येक दिंडीतुन दोन स्वयंसेवक द्यावेत. अशा मागण्या बैठकीत करण्यात आल्या.      या बैठकीस मालक राजाभाऊ आरफळकर, सोहळा प्रमुख योगेश देसाई , विश्वस्थ डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. अभय टिळक, नामदेव महाराज वासकर, व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांच्यासह दिंडी प्रमुख उपस्थित होते . 

..............पत्रकाराला धक्काबुक्की      दिंडी समाजाच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या लोकमतच्या अमोल अवचिते पत्रकाराला यावेळी धक्काबुक्की करण्यात आली व त्यांना बैठकीतून बाहेर काढण्यात आले. सदर वृत्त कळताच पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिंडी समाजाच्या बैठकीत जावून जाब विचारला. त्यावेळी सदर घटना अनवधनाने झाली. याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो असे प्रमुख विश्वस्थ ॲड. विकास ढगे पाटील, माऊली जळगावकर, राणू वासकर, अध्यक्ष मारुती कोकाटे यांनी सांगितले. त्यानंतर या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला .

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीPandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीGovernmentसरकार