शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

वेल्ह्यातील आरोग्य सेवेचा पंचनामा

By admin | Updated: June 4, 2015 22:51 IST

वेल्हे तालुक्यातील पासली आरोग्य केंद्रात उपचार न मिळाल्याने दि. २८ मे रोजी गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याने वेल्हे तालुक्यातील आरोग्य सेवेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील पासली आरोग्य केंद्रात उपचार न मिळाल्याने दि. २८ मे रोजी गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याने वेल्हे तालुक्यातील आरोग्य सेवेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. ३) येथे भेट देऊन पाहणी केली. पासलीसह तालुक्याच्या आरोग्य सेवेचा पंचनामाच केला. पासली आरोग्य केंद्र्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद सोनवणे यांच्यावर कारवाईसाठी मागील सर्व रेकॉर्डची पाहणी करण्यात येणार असून, डॉ. शशिकांत माने यांची तालुका वैद्यकीय अधिकारी पदावरून हकालपट्टी करण्यात आली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.पासली आरोग्य केंद्राला भेट दिली. त्या ठिकाणी असलेली अद्ययावत यंत्रसामग्री धूळ खात पडून आहे. येथील शस्त्रक्रिया कक्षाचा गेल्या वर्षभरापासून वापरच झालेला नाही. रक्तदाब तपासणी मशिनमध्ये प्रिंटसाठी कागद उपलब्ध नव्हता. शौचालये अस्वच्छ होती. रुग्णांसाठी आणलेला दूरदर्शन संचही बंद होता. इंडो जर्मन प्रकल्पातून लाखो रुपये खर्र्चून उभारलेल्या या दवाखन्याची अवस्था पाहून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. यानंतर तेथेच सर्व कर्मचाऱ्यांसमवेत बैठक घेऊन रुग्णांना चांगली सेवा देता येत नसेल, तर राजीनामा देऊन घरी जा, अशा शब्दांत त्यांना सुनावले. या बैठकीला पासलीचे सरपंच अंकुश तुपे, केळदेचे माजी सरपंच रमेश शिंदे, पंचायत समिती सभापती सविता वाडघरे, उपसभापती चंद्र्रकांत शेंडकर, माजी सभापती चतुरा नगिने, जिल्हा आरोग्य समितीच्या सदस्य वसुधा नलावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.येथील सुपरवायझर अनिरुद्ध काकडे व लेखनिक इंगुळकर यांचा निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.कंरजावणे आरोग्य केंद्रातील कर्मचारी सुनील दिघे व वामन कांबळे या कर्मचाऱ्यांच्या कामाबाबात असमाधान असून पंचायत समितीने निलंबनाचे प्रस्ताव द्यावेत, अशी सूचना त्यांनी केली. तसेच, मुख्यालयात न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची एक वेतनवाढ रोखणार व वर्ग चारमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे सात दिवस विनावेतन करण्यात आले असल्याचेदेखील त्यांनी या वेळी सांगितले. महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असलेले डॉ. सोनवणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, पंचायत समितीतर्फे प्रस्ताव पाठवणार असल्याचे सभापती सविता वाडघरे यांनी सांगितले. (वार्ताहर) अधिकाऱ्याची हकालपट्टीतालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत शिंदे हे अकार्यक्षम असून त्यांचे तालुक्यातील आरोग्य सेवेवर कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे त्यांची तालुका वैद्यकीय अधिकारी पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे.पासली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद सोनवणे यांनी कोणालाही न सांगता मुख्यालय सोडले व त्यांच्या बरोबरीने तेथील सर्व कर्मचाऱ्यांनीदेखील रुग्णालय सोडले. त्यांची बिनपगारी रजा करून सोनवणे यांचे रकॉर्ड तपासून कारवाई करण्यात येईल- डॉ. नंदकुमार देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी ४प्राथमिक आरोग्य केंद्रातील बंद पडलेल्या उपकरणांच्या४दुरुस्तीसाठी तातडीने निधी मंजूर करणार.४दैनंदिनी पूर्ण असणाऱ्यांचाच पगार काढणार.४तालुक्यातील गावागावांत आरोग्यदूत योजना राबवणार.४लवकरच सर्वत्र बायोमेट्रिक पद्धत राबवणार.४‘डॉक्टर तुमच्या दारी’ योजनेची सुरुवात करणार.