शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

पालिका पोसतेय सरकारी जावई

By admin | Updated: June 26, 2015 04:29 IST

कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीवरून काही नगरसेवकांनी महापालिकेला धारेवर धरल्यानंतर, पालिका प्रशासनाने वसुली मोहीम उघडली खरी; मात्र महापालिकेच्या थकबाकीदारांमध्ये

विशाल शिर्के, पुणेकोट्यवधी रुपयांच्या थकबाकीवरून काही नगरसेवकांनी महापालिकेला धारेवर धरल्यानंतर, पालिका प्रशासनाने वसुली मोहीम उघडली खरी; मात्र महापालिकेच्या थकबाकीदारांमध्ये विविध सरकारी कार्यालयांचाही मोठा भरणा असल्याची माहिती समोर आली आहे. लाख रुपयांपासून ते कोटभर रुपयांपर्यंत सरकारी कार्यालयांनी मिळकतकराची थकबाकी ठेवली आहे. या कार्यालयांच्या वसुलीकडे दुर्लक्ष करून, पालिका सरकारी जावईच पोसत असल्याचे चित्र आहे. महापालिका प्रशासनाकडून अपवाद वगळता नियमाने करवाढीचा प्रस्ताव दिला जातो. अनेकदा ती वाढ मान्यही होते; मात्र दुसरीकडे मिळकत कर, भाड्यापोटी मिळणाऱ्या रकमेची वसुलीच होत नसल्याचे वास्तव आहे. याच मुद्द्यावर विरोधकांनीही करवाढ हाणून पाडली होती. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याच मुद्द्यावरून सध्या काही नगरसेवकांनी महापालिकेला धारेवर धरले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अखेर करवसुलीसाठी विशेष योजना तयार केली असून, त्या अंतर्गत थकबाकीदारांच्या दारात बँड वाजविण्यात येणार आहे. चार झोन करिता ४ बँड पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, येत्या सप्टेंबरपासून वसुलीसाठी त्यांचा वापर करण्यात येणार आहे. बड्या थकबाकीदारांपासून त्याची सुरुवात केली जाईल. स्थानिक संस्था कर (एलबीटी) बंद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मिळकतकराच्या उत्पन्नावरच पालिकेला आता लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. मात्र, ‘लोकमत’च्या हाती आलेल्या कागदपत्रांनुसार या २ जूनअखेरपर्यंत अनेक सरकारी कार्यालयांकडेच कोट्यवधींची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. त्यात संरक्षण, कृषी, सेंट्रल एक्साइज, रेल्वे, जिल्हाधिकारी कार्यालय, ससून, पोलीस, शिक्षण विभाग, एसआरपीएफ, येरवडा जेल, पीडब्लूडी अशा विविध आस्थापनांकडे मिळकतकर थकीत आहे. त्यामुळे महापालिका आता सरकारी कार्यालयांसमोर बँड वाजवून वसुली करणार का ? याबाबत उत्सुकता आहे. ‘माहिती अधिकार’ चळवळीतील कार्यकर्ते जयप्रकाश उणेचा यांनी ‘माहिती अधिकारा’त ही माहिती समोर आणली आहे. शहरात तब्बल १७५ थकबाकीदार असून, त्यांच्याकडे एकूण २६१ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदारांमध्ये नामांकित बिल्डर, शिक्षणसंस्थाचालकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. महापालिका प्रशासनाने या मोठ्या थकबाकीदारांवर वर्षानुवर्षापासून मेहरनजर दाखविली असल्याची टीका होत आहे.