शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी नोट पुण्यात कशी आली? भुकूम येथील सोसायटीत आढळली पाकिस्तानी चलनातील नोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 14:53 IST

हा प्रकार नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) च्या हद्दीपासून काही मीटर अंतरावर घडला आहे.  

- किरण शिंदे पुणे मुळशी तालुक्यातील भुकूम येथील स्काय आय मानस लेक सिटी सोसायटीमध्ये पाकिस्तानी चलनाची नोट आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) च्या हद्दीपासून काही मीटर अंतरावर घडला आहे.  

सोसायटीचे चेअरमन सहदेव यादव यांच्या निदर्शनास लिफ्टच्या बाहेर ही नोट आढळली. त्यानंतर त्यांनी तातडीने बावधन पोलीस ठाण्यात संपर्क साधून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे.  

 

सापडलेली पाकिस्तानी नोट वापरात असलेली असून, तिची स्थिती पाहता ती अनेक वेळा वापरण्यात आल्याचे दिसून येते. ही नोट कोणाच्या खिशातून चुकून पडली की ती अन्य कोणत्या कारणाने येथे आली, याचा तपास करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. पाकिस्तानी नोट पुण्यात कशी आली? असा प्रश्न चर्चेत आला आहे. या प्रश्नाचे उत्तर अद्याप स्पष्ट झालेले नसून, बावधन पोलीस सखोल चौकशी करत आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसnda puneएनडीए पुणेCourtन्यायालय