स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला पुण्यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 16:13 IST2023-08-15T16:12:59+5:302023-08-15T16:13:28+5:30

या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Pakistan Zindabad slogans in Pune on the eve of Independence Day; Both were arrested | स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला पुण्यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे; दोघांना अटक

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला पुण्यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे; दोघांना अटक

- किरण शिंदे

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. कोंढवा पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात एका शाळेचे बांधकाम सुरू आहे. दोन व्यक्ती या शाळा बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. सोमवारी रात्रीच्या सुमारास हे दोघे पाकिस्तान जिंदाबादचे नारे देत होते. त्या ठिकाणाहून जाणाऱ्या काही नागरिकांनी त्यांनी दिलेले हे नारे ऐकले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. 

दरम्यान झाल्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कुठला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्या या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही केली आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत

Web Title: Pakistan Zindabad slogans in Pune on the eve of Independence Day; Both were arrested