शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
3
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
4
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
5
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
6
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
7
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
8
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
9
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
10
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
11
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
12
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
13
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
14
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
15
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
16
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
17
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
18
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

बायोमेडिकल वेस्टसाठी रुग्णांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 1:12 AM

इमर्जन्सीमुळे रात्री १२ वाजता शहरातील एका रुग्णालयात रुग्णाला दाखल केले.

- सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : इमर्जन्सीमुळे रात्री १२ वाजता शहरातील एका रुग्णालयात रुग्णाला दाखल केले. अतिदक्षता विभागात (आयसीयू) रात्री १२ ते सकाळी ११ वाजेपर्यंत ठेवून सोडण्यात आले. बारा तासांत एक सलाईन बाटली, दोन-तीन सिरींज असे बायोमेडिकल वेस्ट तयार झाले. परंतु या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी रुग्णाला तब्बल ३०० रुपये खर्च द्यावा लागाला. महापालिकेकडून यासाठी हॉस्पिटलकडून प्रतिखाट, प्रतिदिवस केवळ ५ रुपये ७७ पैसे दर आकारले जात असताना बायोमेडिकल वेस्टच्या नावाखाली रुग्णांकडून मात्र अवाच्या सवा पैसे वसूल केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.शहरातील विविध हॉस्पिटल, नर्सिंग होम, ब्लड बँक, पॅथॉलॉजी लॅब, क्लिनिक आदी ठिकाणी वापरलेल्या लशी (इंजेक्शन्स), सलाईन बाटल्या, मलमपट्टी केलेले कापसाचे बोळे, शस्त्रक्रिया करून काढलेले भाग, बँडेजेस, रक्त, थुंकी, लघवीचे नमुने, औषधे असा विविध प्रकाराच्या कचºयाचा बायोमेडिकल वेस्टमध्ये (जैववैद्यकीय कचरा) समावेश होतो. या कचºयाची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्यास शहरात मोठ्या प्रमाणात साथीचे व जीवघेण्या आजारांचे रोगजंतू पसरू शकतात. तसेच दवाखान्यात वापरण्यात येणारी रसायने व औषधे यांचा गैरवापर होऊ शकतो. ही रसायने पाण्याच्या स्रोतात मिसळल्यास मानवाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे शहरातील प्रत्येक रुग्णालयाकडून असा बायोमेडिकल वेस्ट लाल, पांढºया आणि पिवळ्या अशा तीन पद्धतीने गोळा केला जातो.>बायोमेडिकल वेस्टसाठी महापालिकेचे दरपत्रकपुणे शहरातील सुमारे ६९९ नर्सिंग होम, १८ ब्लड बँक, ३८३ पॅथॉलॉजी लॅब आणि तब्बल ३ हजार ६६१ दवाखाने, क्लिनिकमधून दररोज असा बायोमेडिकल वेस्ट गोळा केला जातो. या सर्व कचºयाचे येथील कैलास स्मशानभूमी येथे इन्सिनरेशन पद्धतीने मे. पास्को एन्व्हायर्न्मेंटल यांच्यामार्फत विल्हेवाट लावली जाते. यासाठी महापालिकेकडून सर्व हॉस्पिटल, ब्लड बँक, पॅथॉलॉजी लॅब, लहान-मोठे क्लिनिककडून या बायोमेडिकल वेस्टसाठी नाममात्र शुल्क घेतले जाते.महापालिकेकडून हॉस्पिटलकडून दिवसाला एका रुग्णाकडून ५ रुपये ७७ पैसे घेतले जाते. परंतु सध्या शहरातील बहुतेक सर्वच प्रामुख्याने मोठ्या रुग्णालयांमध्ये एकूण बिलाच्या १० ते १२ टक्के दर आकारले जात असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.>महापालिकेच्या वतीने प्रत्येक हॉस्पिटल, ब्लड बँक, लहान-मोठे क्लिनिक यांना बायोमेडिकल वेस्टसाठी दर निश्चित केले आहेत. त्यानुसारच संबंधित हॉस्पिटलने रुग्णांकडून दर वसूल करणे अपेक्षित आहेत. महापालिकेकडून दर वर्षी असे दर वसूल केले जातात. त्यानंतरच हॉस्पिटलचे परवाने व अन्य आवश्यक परवान्याचे नूतनीकरण केले जाते. परंतु हॉस्पिटलकडून अशा प्रकारचे १० ते १२ टक्के दर केवळ बायोमेडिकल वेस्टसाठी वसूल करत असतील तर चुकीचे आहे.- डॉ. वैशाली जाधव, प्रभारी आरोग्यप्रमुख, महापालिका

टॅग्स :hospitalहॉस्पिटल