पीएमपीतील अनेक अधिकारी व तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांकडे जड वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे समोर आले आहे. संबंधितांना परवाना मिळविण्याची नोटीस अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बजावली आहे. ...
कसबा गणपती मंदिरात माघी गणपती उत्सवानिमित्त ‘गोफ सुरांचाऽ हा अत्यंत बहारदार कार्यक्रम झाला. यामध्ये डॉ.राजश्री महाजनी, जया जोग, डॉ. नीलिमा राडकर यांनी गायन व सतार-व्हायोलिनच्या वादनाचा एकत्रित स्वराविष्कार करून रसिकांची दाद मिळवली. ...
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा राम कदम कलागौरव पुरस्कार प्रसिध्द गायक शंकर महादेवन आणि शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांना जाहीर झाला आहे. १ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ...
कुरकुंभ (ता. दौंड) येथील रासायनिक प्रकल्पातील घडामोडी काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. ‘मेल्झर केमिकल्स’ या कंपनीतील अतिरिक्त रसायनांचा व रासायनिक उत्पादनाचा साठा त्यांनी चक्क रस्त्यावरच केला आहे. ...
रेल्वेच्या पुणे विभागाने एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत २ लाख १४ हजार फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. याअंतर्गत त्यांच्याकडून तब्बल ११ कोटी १९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
रामवाडी परिसरातील ओला कंपनीत कामाला असलेल्या ५ कर्मचाऱ्यांनी ग्राहकांकडून आलेले पैसे कंपनीत न भरता त्याचा अपहार करून कंपनीची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या वतीने पुणे विभागात राबविण्यात आलेल्या दुधाच्या विशेष मोहिमेत २६ हजार ५२० रुपयांचा एकूण ६१५ लिटर इतका दुधाचा साठा नष्ट करण्यात आला. ...
नाट्य परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एका प्रसिद्ध रंगकर्मी आणि दिग्दर्शकाने सोशल मीडियावर वार्तापत्र सुरू केले असून, ते वार्तापत्र नाट्यवर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. इतर रंगकर्मींकडून हे वार्तापत्र शेअर केले जात आहे ...
नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी येत्या २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान पुण्यात ‘गानसरस्वती महोत्सव’ रंगणार आहे. ...