उजनी धरण प्रशासनाला अद्याप आदेश प्राप्त न झाल्याने धरणातून भीमा नदी अथवा कालव्यात पाणी सोडण्यात आलेले नाही. पाणी सोडण्यासाठी किमान दोन दिवस लागतील अशी माहिती अधिका-यांनी दिली. ...
भारतात सर्व समाज एकत्र ठेवायचा असेल तर छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती शंभूराजांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. जयंती पुण्यतिथी नावापुरती साजरी न करता शिवशंभू छत्रपतींचा विचार दैनंदिन जीवनात अंगिकारला तरच खऱ्या अर्थाने शिवशंभूना मानवंदना ठरू शकते ...
संपूर्ण दारूबंदीसंदर्भात महसूल, राज्य उत्पादनशुल्क व पोलीस आदी विभागांनी गळचेपी भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ आंदोलक, क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी गुरुवारी तहसीलदारांच्या दालनात दारूने अंघोळ केली. ...
दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे फळबागा, वेलवर्गीय पिकांवर भुरी, मर या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी जिल्ह्यातील काही भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. ...
कोरेगाव भीमा येथील दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीमध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या वारसांना पाच लाख रुपये तसेच दोन व्यक्तींनी घराच्या दुरूस्तीसाठी प्रत्येकी ३५ हजार रुपये आणि एका जखमी व्यक्तीस पाच हजार रुपये मदतनिधी दिला जाणार आहे. ...
पुणे-नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी गावाच्या हद्दीत रस्ता ओलांडणाऱ्या ७ वर्षांचा बालक टेम्पोखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती ठाणेअंमलदार एम. एम. शेख यांनी दिली. ...
लहानपणापासून दुचाकीचे वेड... आपले गाडी बनवण्याचे वेड पूर्ण करण्यासाठी निडगी येथून आणलेल्या स्क्रॅब गाडीच्या सांगाड्यावर दिवस-रात्र मेहनत घेत सोमेश्वर येथीळ एका तरुणाने चक्क ३० हजार खर्च करून भंगारातून तब्बल १ लाख ५० हजारांची गाडी बनवली. ...
महापालिका आयुक्तांकडून मंजुरीसाठी आग्रह होत असलेले वाहनतळ धोरण स्थायी समितीने सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे महिनाभर लांबणीवर टाकले आहे. अभ्यासासाठी म्हणून असा निर्णय घेतला असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले. ...