यात्रेनिमित्त फटाक्यांच्या आताषबाजीसाठी संगमनेर येथील शोभेच्या दारूकामाचे सादरीकरण करणारे लोक बोलावण्यात आले होते.आताषबाजीचा खेळ सुरु असताना फटाक्यांची एक ठिणगी फटाक्यांच्या गोणीवर पडली. यामुळे सर्व फटाक्यांचा एकदम स्फोट झाला. ...
पुणे-पंढरपुर पालखी मार्गावर नीरा नजीक पिंपरे खुर्द हद्दीत फर्निचरच्या दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत दुकानातील एक कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...
आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवीन पदाधिकारी निवडीचे संकेत मिळताच नाराजीनाट्य सुरू झाले आहे. परंदर तालुक्यातील सर्वच जुन्या पदाधिकाºयांनी राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे दिल्याने खळबळ उडाली आहे. ...
शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयातील पार्किंग, वकिलांची सुरक्षा, स्वच्छता, बार रूम आणि सीसीटीव्ही कॅमेरा अशा अनेक बाबींमध्ये वाढ करणे गरजेचे आहे. या समस्या सोडविण्यासाठी अकरा कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. ...
आज संगीतशास्त्र आणि कलाविष्कार यांच्यातील अंतर वाढत चालले आहे. काळानुसार संगीत कलाविष्काराचे सादरीकरण बदलत आहे. मात्र, शास्त्र हे प्राचीन ग्रंथातच अडकून पडले आहे. कोणत्याही कलेला वर्तमानाचा संबंध लावता आला पाहिजे, तर ती परंपरा टिकते आणि सशक्त बनते. ...
पत्नीचा शारीरिक, मानसिक छळ करणारा पती व त्याच्या नातेवाईकाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी हा आदेश दिला. ...
नेचरोपथीचा डॉक्टर बनविण्यासाठी एका दिवसात पदवी देण्याचे आमिष दाखवून १० हजार रुपयांची मागणी करीत फसवणुकीचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघड झाला असून कोथरूड पोलिसांनी तिघा डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे़ ...
मानवी वाहतूक रोखण्याकरिता येत्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाकडून मानवी तस्करी (प्रतिबंध, संरक्षण व पुनर्वसन) २०१८ हे विधेयक आणले जाणार आहे. ...