मुठा नदीचा उजवा कालवा दांडेकर पूल, सिंहगड परिसरातून जातो. याच कालव्याची भिंत दुपारी कोसळली. त्यानंतर खडकवासला धरणातून सोडण्यात येणारं पाणी थांबवण्यात आलं असून दांडेकर पुलावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. ...
आनंदनगर येथील डोंगरे कुटुंबीयांचा ९ वर्षांचा मुलगा सार्थक याचा मृत्यू घरात केलेल्या औषधफवारणीमुळे (पेस्ट कंट्रोल) झाला की विषबाधेमुळे, याचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही. ...
पुणे शहरातील गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना कर्करोग (कॅन्सर) सारख्या गंभीर आजारांवर अल्पदरात उपचार उपलब्ध होण्यासाठी महापालिकेच्या वतीने पीपीपी अथवा बीओटी तत्त्वावर स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल उभारणार आहे. ...
राजकीय दबावातून काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना अटक केली, या काँग्रेसच्या आरोपाला भारतीय जनता पार्टीने सत्तेचा फायदा घेण्याची सवय तुमचीच आहे, असे उत्तर दिले आहे. ...
दारू आणि चोरीच्या गुन्ह्यांमधील शिक्षेचे प्रमाण कमी आहे. गुन्हेगारांप्रमाणेच दागिन्यांची ओळख परेड घेतली तर शिक्षेचे प्रमाण वाढू शकते, अशी सूचना सीआयडीचे प्रमुख व अपर पोलीस महासंचालक संजीव सिंघल यांनी केली. ...