शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

Night Trekking: किल्ल्यावरील चांदण्यारात्रीचा मुक्काम आता विसर गड्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 19:57 IST

रायगड, राजगड, तोरणा, लोहगड, तिकोणा, हरिश्चंद्रगड या महत्त्वाच्या किल्ल्यांवर रात्रीचा मुक्काम करता येत नाही

गणेश खंडाळे 

करोना लॉकडाऊनची बंधनं हटली आहेत. महाराष्ट्रामधील पर्यटन पुन्हा एकदा पूर्वपदावर येत असतानाच किल्ल्यांवर रात्रीच्या मुक्कामाला बंदीच्या बातम्यांनी पर्यटन, ट्रेकिंग जगत ढवळून निघाले आहे. रायगड, राजगड, तोरणा, लोहगड, तिकोणा, हरिश्चंद्रगड या महत्त्वाच्या किल्ल्यांवर रात्रीचा मुक्काम करता येत नाही. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेतच किल्ला पाहता येणार आहे. दुर्गसंवर्धन करणाऱ्या विविध संघटना व पुरातत्त्व खात्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून किल्ल्यांवर दरवाजे बसविण्यात आले आहेत. ते दरवाजे सायंकाळी बंद होतात.

महाराष्ट्रात असणारे किल्ले डोंगरी किल्ले या सदरामध्ये मोडणारे आहेत. डोंगरी किल्ला म्हणजे डोंगररांगेच्या बेलाग कड्यांना तटबंदीचे मुंडासं बांधून किल्ल्याची हद्द निर्माण करण्यात येते. बहुतांश किल्ले हे अवाढव्य क्षेत्रफळाचे आणि दुर्गम आहेत. एका भेटीत किल्ला पाहणं हे अशक्य दिव्य असतं. शासकीय पातळीवर महाराष्ट्रातील पर्यटन वाढविणे गरजेचे आहे असे संकल्प घेतले जातात. आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक वारशातून निर्माण झालेले पर्यटन सरसकट बंदी घालवून त्याच्यातून निर्माण होणाऱ्या आणि एकूणच भटकंतीवर घाव घालणारे निर्णय घातक ठरतात.

रायगडावर रात्रीच्या मुक्कामाबद्दल ज्येष्ठ डोंगर भटके लेखक प्र. के घाणेकर यांनी रायगडावरील रात्रीच्या मुक्कामबंदीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करीत आता रायगडावर का जायचं, असा उद्विग्न सवाल केला. रायगडावर महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने काही बंगले बांधले आहेत. अनेक वर्षं लोक ते बंगले वापरत आहेत. तीन - साडेतीन वर्ष बंगले बंद आहेत. रायगडाचा विस्तार इतका अवाढव्य आहे की रायगड एका दिवसात पाहणे शक्यच होत नाही. गेले ४० ते ४५ मी रायगड पाहतोय; परंतु म्हणू शकत नाही की रायगड संपूर्ण पाहिला आहे. तिथली मुक्कामाची व्यवस्था बंद करणे हे चुकीचे आहे. मुक्काम कुणी बंद केले, कशासाठी बंद केले. जर त्यातून सरकारला महसूल मिळत आहे. तरी बंद का केले. ही सरकाने केलेली एक प्रकारची मुस्कटदाबीच आहे. 

लोक यातूनही पळवाटा काढणार

ज्येष्ठ गिर्यारोहक लेखक व महाॲडव्हेचर कौन्सिलचे संस्थापक अध्यक्ष वसंत वसंत लिमये यांनी सरसकट बंदीला विरोध केला. मुळात महाराष्ट्रामध्ये डोंगरांच्या माथ्यावर मुक्काम करता येईल, अशी परिस्थिती असणारे नैसर्गिक पर्याय आहे. हिमालय, आल्फ, रॉकी या जगातील मोठ्या डोंगररांगांवर मुक्काम करता येत नाही. कारण तशा मुक्काम योग्य सोयी नाहीत. महाराष्ट्रातील डोंगरांच्या सर्वोच्च शिखरांवर असणाऱ्या किल्ल्यांवर हे करता येते. आता लोक चौकीदाराला, स्थानिकांना चिरीमिरी देऊन यातून पळवाटा काढणार. दुर्गसंवर्धक, ट्रेकर, संघटक  मंगेश निरवणे यांनीही या निर्णयाचा विरोध केला आहे तर मिलिंद क्षीरसागर (शिवाजी ट्रेल) यांनी मात्र किल्ल्यावर मुक्कामाला बंदी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

किल्ला संवर्धनाच्या दृष्टीने हा निर्णय हितकारकच

किल्ल्यावर मुक्कामबंदी हा किल्ला संवर्धनाच्या दृष्टीने हितकारकच आहे.  किल्ल्यावर भेट देणारे सगळेच चांगले नसतात. रात्रीच्या मुक्कामावर बऱ्याच गोष्टी घडतात. किल्ल्याच्या पावित्र्याच्या दृष्टीने गालबोट लागणाऱ्या गोष्टी घडतात. त्यावेळी तेथे लक्ष ठेवणारेदेखील कोणीच नसते शिवदुर्ग मित्र संघटनेचे सुनील गायकवाड यांनी सांगितले. 

किल्ल्यावर मुक्काम हा प्रतिबंधित 

किल्ल्यावर मुक्काम हा सन १९६० च्या कायद्यानुसार प्रतिबंधित आहे. या कायद्यानुसार किल्ल्यावर कोणालाही अन्न शिजवता येत नाही असे राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी सांगितले.  

सरसकट बंदी करणं म्हणजे रोगापेक्षा इलाज जालीम

किल्ल्याच्या संवर्धनासाठी एकवेळ हा निर्णय मान्य असला तरी सर्वसामान्य भटकणारा ट्रेकर, शिवप्रेमी, इतिहास अभ्यासकांच्या दृष्टीने हा अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. या निर्णयावर संबंधित प्रशासन, स्थानिक नागरिक यांनी मध्यम काढणे गरजेचे आहे. सरसकट बंदी करणं म्हणजे रोगापेक्षा इलाज जालीम असा प्रकार असल्याचे दुर्ग अभ्यासक संदीप तापकीर म्हणाले आहेत. (लेखक पुणे लोकमत आवृत्तीचे उपसंपादक आहेत.) 

टॅग्स :Trekkingट्रेकिंगSocialसामाजिकStudentविद्यार्थीtourismपर्यटन