शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

अरे बापरे! 'अनलॉक' मध्ये रेल्वे व विमानाने पावणे चार लाखांवर प्रवाशांची पुण्यात ये-जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 21:15 IST

लॉकडाऊननंतर देशभरात काही प्रमाणात दि. २५ मे पासून विमानसेवा तर दि. १ जून पासून रेल्वे सेवा सुरू झाली.

ठळक मुद्देकोरोनाचे संकट गडद होत असताना गेल्या दोन महिन्यात पुणे सोडणारेच अधिक

पुणे : अनलॉकमध्ये रेल्वे व विमानसेवा सुरू झाल्यानंतर मागील दोन महिन्यांत सुमारे पावणे चार लाख प्रवाशांनी पुण्यात ये-जा केली आहे. त्यामध्ये सव्वा दोन लाखांहून अधिक विमानप्रवासीच आहेत. तसेच पुणे सोडणाऱ्यांचीच संख्या जवळपास तेवढीच आहे. पुण्यात कोरोनाचे संकट गडद होत चालले असले तरी येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत फारसा फरक पडलेला दिसत नाही.

लॉकडाऊननंतर देशभरात काही प्रमाणात दि. २५ मे पासून विमानसेवा तर दि. १ जून पासून रेल्वे सेवा सुरू झाली. पुण्यातून प्रामुख्याने दिल्ली, अहमदाबाद, जयपुर, कोची, लखनऊ, बेंगलुरू, हैद्राबाद आदी शहरांत विमानांची ये-जा सुरू आहे. तर पुणे-दानापुर (पटना) ही एकमेव रेल्वेगाडी थेट पुणे रेल्वे स्थानकातून सुटते. मुंबईतून सुटून पुणेमार्गे जाणाºया चार तर गोव्यातून येणारी एक गाडी आहे. मात्र, दानापूर एक्सप्रेसने ये-जा करणाºया प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. विमानसेवा सुरू झाल्यानंतर आठवडाभर विमान व प्रवाशांची संख्या १५ पर्यंत स्थिर होती. पण नंतर ये-जा करणाऱ्या विमानांचा आकडा जवळपास ५० पर्यंत वाढला. तसेच प्रवाशांचा आकडाही ४ ते ५ हजारांपर्यंत वाढत गेला. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये सुरूवातीचे तीन-चार दिवस प्रवासी कमी झाले. पण पुन्हा त्यात वाढ होऊन दैनंदिन संख्या ३ हजारांच्या पुढे गेली. दोन महिन्यांत विमानाने सव्वा दोन लाखांहून अधिक प्रवाशांनी ये-जा केली. रेल्वे प्रवाशांची संख्याही लॉकडाऊनमध्ये कमी झाली होती. त्यापुर्वी दानापुर एक्सप्रेसने दररोज १३५० ते १४०० प्रवासी पुणे सोडत होते. तर सुमारे ८०० ते १००० पुण्यात येणारे प्रवासी होते. अन्य गाड्यांनी सुमारे ५००-६०० प्रवाशांचीच ये-जा होत असते. त्यामुळे रेल्वेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या जवळपास अडीच ते तीन हजार आहे. ----------------विमान उड्डाणे - दिल्ली, जयपुर, अहमदाबाद, बेंगलुरू, कोची, लखनौ, हैद्राबाद आदी. दि. २४ जुलैची स्थिती उतरलेली विमाने - २१प्रवासी - १३९४उड्डाण केलेली विमाने - २१प्रवासी - १९६९----------------दि. १ जून पासून पुण्यातून धावणाऱ्या गाड्या -- पुणे ते दानापुर एक्सप्रेस- मुंबई सीएसटी -भुवनेश्वर कोनार्क एक्सप्रेस (पुणे मार्गे)- मुंबई सीएसटी - गडग एक्सप्रेस (पुणे मार्गे)- मुंबई सीएसटी - बेंगलुरू उद्यान एक्सप्रेस (पुणे मार्गे)- मुंबई सीएसटी - हैद्राबाद हुसेनसागर एक्सप्रेस (पुणे मार्गे)- वास्को द गामा - निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस (पुणे मार्गे)----------पुण्यात ये-जा केलेल्या प्रवाशांची संख्या -विमान प्रवासी - एकुण - सुमारे २ लाख १५ हजारआलेले - १ लाख ३० हजारगेलेले - ८५ हजाररेल्वे प्रवासी - एकुण - सुमारे १ लाख ५० हजारआलेले - ९००००आलेले - ६० हजार------------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेairplaneविमानpassengerप्रवासी