शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांपैकी येडगाव आणि वडज धरणे १०० टक्के भरली;विसर्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 15:44 IST

कुकडी प्रकल्पामधील सर्व धरणे सरासरी ५९.५५ टक्के भरली आहेत..

ठळक मुद्देगेल्यावर्षी आजमितीला सर्व धरणांमध्ये ९१.२२ टक्के पाणीसाठा झाला होता.

नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांपैकी येडगाव , वडज ही धरणे १०० टक्के भरली असून या धरणातून कालवा आणि नदीद्वारे विसर्ग सुरु करण्यात आला आहे . तर डिंभा धरण हे ८४ टक्के भरले आहे, अशी माहिती नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्र.०१ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली .    दरम्यान, कुकडी प्रकल्पामधील सर्व धरणे सरासरी ५९.५५ टक्के भरली आहेत. गेल्यावर्षी आजमितीला सर्व धरणांमध्ये ९१.२२ टक्के पाणीसाठा झाला होता. गेल्यावर्षीची व आजची तुलना करता सर्व धरणे मिळून ३१.६७ टक्के पाणीसाठा कमी आहे . जूनपासून चांगल्या पावसाला सुरवात झाली मात्र धरणाच्या पाणलोटक्षेत्रात कमी पाऊस झाल्याने माणिकडोह आणि पिंपळगाव जोगा ही धरणे अद्याप भरलेली नाहीत.  .........

जुन्नर तालुक्यातील पाच धरणांचा उपयुक्त पाणीसाठा व टक्केवारी तसेच झालेल्या पाऊसाचे प्रमाण पुढीलप्रमाणे: 

येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण पाणीसाठा १८६० द.ल.घ.फुट ( ९५.७१ टक्के ) असून या धरणातून कुकडी डावा कालव्यातून विसर्ग सुरु आहे , धरणाच्या  पाणलोटक्षेत्रात १ जून पासून आजअखेर ७०२ मि.मी.पाऊस तर २४ तासात १७ मि. मी. पाऊस झालेला आहे.माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण पाणीसाठा ३४७८ द.ल.घ.फुट ( ३४.१७ टक्के ) पाणीसाठा उपलब्ध आहे , पाणलोटक्षेत्रात १ जून पासून आजअखेर ४९३ मि.मी.पाऊस झालेला आहे. असून २४ तासात २० मि.मी.पाऊस झालेला आहे .

वडज धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण पाणीसाठा १०७४ द.ल.घ.फुट ( ९१.५५ टक्के ) पाणीसाठा उपलब्ध आहे , या धरणातून मीना नदीत ७६४ तर मीना शाखा कालवा द्वारे २२० कुसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे . पाणलोटक्षेत्रात १ जून पासून आजअखेर ३४३ मि.मी.पाऊस झालेला आहे. असून २४ तासात १ मि.मी.पाऊस झालेला आहे .      पिंपळगाव जोगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण पाणीसाठा ९२८ द.ल.घ.फुट ( २३.८५ टक्के ) पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणलोटक्षेत्रात १ जून पासून आजअखेर ५३५ मि.मी.पाऊस झालेला आहे. असून २४ तासात ११ मि.मी.पाऊस झालेला आहे. आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरणात १०८११ द.ल.घ.फुट ( ८६.५२ टक्के ) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे . धरणाच्या पाणलोटक्षेत्रात १ जून पासून आजअखेर ६८९ मि.मी.पाऊस झालेला आहे. २४ तासात ९ मि.मी.पाऊस झालेला आहे , अशी माहिती कार्यकरी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली .

टॅग्स :narayangaonनारायणगावDamधरणWaterपाणीriverनदी