शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"ईडी चौकशीसाठी आमची सहकार्याची भुमिका", आमदार रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 15:04 IST

रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार ईडीला प्राप्त झाली असुन ईडीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश

बारामती : ईडी चौकशीच्या पार्श्वभुमीवर आमदाररोहित पवार यांनी सबंधित यंत्रणांना सहकार्य करण्याची भुमिका घेतल्याचे सांगितले. यापूवीर्ही वेगवेगळ्या यंत्रणांनी बोलावले आहे. त्यावेळी आम्ही सहकार्यच केलं आहे. तसंच आताही सहकार्य करणार असल्याची भुमिका आमदार पवार यांनी मांडली.

आमदार रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार ईडीला प्राप्त झाली असुन ईडीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभुमीवर माळेगांव शारदानगर येथे पत्रकारांशी बोलताना आमदार पवार यांनी हि प्रतिक्रीया व्यक्त केली.

यावेळी पवार पुढे म्हणाले, नेमकं प्रकरण काय, कशाच्या आधारे बातम्या आल्या, हे माहिती नाही.मला हा विषय समजून घ्यावा लागेल, मला याबद्दल निरोप आल्यानंतर सत्यता लोकांसमोर ठेवु. आता जी कारवाई आहे, ती कोणत्या हेतूने किंवा जाणीवपूर्वक झालीय का हे पहावे लागेल. मात्र न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जी चौकशी असेल, त्याला सामोरे जाईल. त्यात काय प्रकरण आहे. हे पहावे लागेल,असे पवार म्हणाले.

सूडबुद्धी, दडपशाहीच्या विरोधात आणि सामान्य लोकांच्या विचाराचा विजय शिवसेना-संभाजी ब्रिगेड युती बाबत पवार म्हणाले, कोणतीही युती ही विषय विचार लक्षात घेवून केली जाते. शिवसेनेला संभाजी ब्रिगेडसोबत युती योग्य वाटत असेल. बलाढ्य शक्तीसोबत लढायचं असल्याने कोणतीही संघटना छोटी किंवा मोठी नसते. सगळ्यांनाच विश्वासात घेवून एकत्र लढलं तर यश मिळू शकतं. सामान्य लोकांच्यात आता जे सुरु आहे, त्याबद्दल तीव्र भावना आहेत. त्यामुळे येत्या काळात ज्या निवडणुका होतील. त्यात सूडबुद्धी, दडपशाहीच्या विरोधात आणि सामान्य लोकांच्या विचाराचा विजय होईल,असे आमदार पवार म्हणाले.

मोहीत कंबोज काय अभ्यास करतात ,याकडे मी लक्ष दिलेले नाही.

काही दिवसांपुर्वी भाजप नेते मोहित कंबोज यांनी अजित पवार यांना ‘टार्गेट’ केले होते. सिंचन घोटाळ्याची नव्याने चौकशी झाली पाहिजे, जुनी फाईल पुन्हा ओपन करावी, अशी मागणी कंबोज यांनी केली होती. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते कंबोज यांच्यावर निशाणा साधत टोला लगावला  होता. त्यानंतर कंबोज यांनी रोहित पवार यांच्या साखर कारखान्यांबाबतचा अभ्यास करीत असल्याचे ट्विट केले होते. या पार्श्वभुमीवर मोहीत कंबोज काय अभ्यास करतात ,याकडे मी लक्ष दिलेले नाही. माझ्यासमोर ज्या गोष्टी येतील, त्याला आणि चौकशीला उत्तर देण्याचा माझा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रीया आमदार पवार यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीRohit Pawarरोहित पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMLAआमदार