शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

Otur Accident : पिकपकॅरीच्या धडकेत एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 19:33 IST

ओतूर : जुन्नर तालुक्यात नगर - कल्याण राष्ट्रीय महामार्गाजवळील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयासमोर पिकपकॅरी व मोटरसायकलचा अपघात झाला. या अपघातात ...

ओतूर : जुन्नर तालुक्यात नगर - कल्याण राष्ट्रीय महामार्गाजवळील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयासमोर पिकपकॅरी व मोटरसायकलचा अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि. २५ ) दुपारी  सव्वा तीनच्या सुमारास घडला.या अपघाताबाबत ओतूर पोलिसांनी सांगितले की,'नगर कल्याण महामार्गावर मोटारसायकलस्वार ओतूरवरून आळेफाट्याच्या दिशेने तर पिकपकॅरी आळेफाट्याच्या दिशेकडून ओतूरकडे जात होती. यादरम्यानं आण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाच्या जवळ दोन्ही वाहन एकमेकांना धडकली.  या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परतेने मोटार सायकलस्वार कुणाल नानाभाऊ काळे (वय १७ वर्ष), रविंद्र सावळेराम भुतांबरे (वय २१ वर्ष)रा. आंबेगव्हाण यांना रुग्णालयात नेले.दरम्यान, डॉक्टरांनी रविंद्र सावळेराम भुतांबरेला मृत घोषित केले. तर श्रीकांत खंडू काळे (वय १७ ) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.' अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात पिकपकॅरी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल  केला असून पुढील तपास सुरु आहे.यापूर्वीही अनेकदा अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर गेटच्या समोर अपघात झाले आहे  स्थानिकांकडून अनेक वर्षापासून स्पीड ब्रेकरची मागणी करण्यात आली आहे परंतु शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिस