शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

इतर कंपन्यांचे उत्पादन ‘एचए’मध्ये

By admin | Updated: June 26, 2015 04:21 IST

भारत सरकारच्या उत्तर भारतातील ऋषीकेश आणि कर्नाटक येथील औषध कंपन्यांतील अतिरिक्त उत्पादन येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबॉयोटिक्स कंपनीत (एचए) करण्यात येणार आहे

पिंपरी : भारत सरकारच्या उत्तर भारतातील ऋषीकेश आणि कर्नाटक येथील औषध कंपन्यांतील अतिरिक्त उत्पादन येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबॉयोटिक्स कंपनीत (एचए) करण्यात येणार आहे. त्यामुळे कंपनीत उत्पादन सुरू करण्याचे व्यवस्थापनाचे प्रयत्न आहेत, अशी माहिती कंपनी व्यवस्थापनाने बुधवारी झालेल्या बैठकीत दिली. मात्र, हा तात्पुरता दिलासा असून, पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू करण्याची मागणी कामगार प्रतिनिधींनी कायम ठेवली आहे. कंपनी पुनर्वसनासाठी काय धोरण आहे, त्या संदर्भात काय पाठपुरावा केला आहे, या संदर्भात ठोस भूमिका समजून घेण्यासाठी एचए मजदूर संघ आणि व्यवस्थापनाची सकाळी बैठक झाली. या वेळी कंपनीचे अधिकारी के. व्ही. वर्की, अनिल वैद्य, व्यवस्थापक टी. दास, संघाचे अध्यक्ष खासदार श्रीरंग बारणे, सचिव सुनील पाटसकर, खजिनदार राजेंद्र धेंडे, प्रदीप देवकर, महेश बधे, संजय भोसले, राजा जाधव, रमेश वाघ आदी उपस्थित होते. सरकारच्या ऋषिकेश येथे आयडीपीएल आणि कर्नाटक येथे केपीएल या औषध कंपन्या आहेत. तेथे क्षमतेपेक्षा अधिक आॅर्डर आहे. त्यामुळे तेथील उत्पादन एचएमध्ये केले जाणार आहे. त्या कंपन्या कच्चा माल आणि साहित्य पुरविणार आहेत. आवश्यक यंत्रसामग्री बसवून देणार आहेत. त्यामुळे येथील उत्पादन सुरू केले जाणार आहे. या संदर्भात त्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी कंपनीस भेट देऊन पाहणी केली. या पद्धतीने उत्पादन सुरू करण्याचे केंद्र शासनाचे धोरण असल्याचे कंपनी व्यवस्थापनाने कामगार प्रतिनिधींना सांगितले. मात्र, कंपनी पुनर्वसन निधीविषयी व्यवस्थापनाने काहीच सांगितले नाही. पूर्ण क्षमतेने उत्पादन घेण्याबाबत व्यवस्थापनाकडे ठोस नियोजन नसल्याचे बैठकीत दिसून आले. सद्य:स्थितीत उत्पादन सुरू केल्यास कामगारांना काम मिळेल. त्यामुळे कंपनी चालविली जाईल. मात्र, कामगारांना वेतन मिळाले पाहिजे, यावर बैठकीत विचारविनियम झाला. यातून मार्ग काढण्याचा निर्णय कामगार प्रतिनिधींनी घेतला. कामगारांचे ९ महिन्यांचे वेतन थकले आहे. त्यामुळे ते व त्याचे कुटुंबीय आर्थिक विवंचनेत आहेत. यातून तातडीने तोडगा काढण्याची मागणी कामगार प्रतिनिधींनी कायम ठेवली आहे. (प्रतिनिधी)