सपकळवाडीत योग शिबिराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:08 IST2021-02-05T05:08:45+5:302021-02-05T05:08:45+5:30

गावात योगा शिबिर व आरोग्य शिबिर राबविन्यात येत आहे. सणसर येथील डॉ. गीतांजली पोळ यांनी योगाचे महत्व आणि महिलांनी ...

Organizing yoga camp at Sapkalwadi | सपकळवाडीत योग शिबिराचे आयोजन

सपकळवाडीत योग शिबिराचे आयोजन

गावात योगा शिबिर व आरोग्य शिबिर राबविन्यात येत आहे. सणसर येथील डॉ. गीतांजली पोळ यांनी योगाचे महत्व आणि महिलांनी आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी या विषयांवर मार्गदर्शन केले. योगा संजीवनी हा उपक्रम शिवानी सचिन सपकळ यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन विद्यानंद फाऊंडेशनकडून करण्यात आले होते. कार्यक्रमसाठी विद्यानंद फाउंडेशन च्या व्यवस्थापिका कु. प्रीती निंबाळकर, डॉ. गीतांजली पोळ, सपकळवाडी गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य सचिन सपकळ, सपकळवाडी गावातील अंगणवाडी शिक्षिका सुदर्शना भुजबळ, उदमाई विद्यालय व ज्यु. कॉलेजचे शिक्षक हनुमंत सपकळ, गावातील ज्येष्ठ शिवाजी नथु सपकळ, राष्ट्रवादी युवक कॉग्रेस चे युवक उपाध्यक्ष तुषार सपकळ, शत्रुघ्न घाडगे, महेश सपकळ उपस्थित होते.

फोटो ओळ : सपकळवाडी गावात आयोजित योग शिबिरात सहभागी झालेल्या महिला.

Web Title: Organizing yoga camp at Sapkalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.