शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

Organ Donation: यकृत, डोळे प्रत्यारोपणासाठी मिरज-पुणे ग्रीन कॉरिडॉर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 20:16 IST

Pune News: मिरजेच्या सेवासदन रुग्णालयातून एका ७५ वर्षीय मृत रुग्णाच्या नातेवाइकांच्या संमतीने यशस्वी अवयवदान करण्यात आले.

मिरजेतील रुग्णालयातून यकृत, मूत्रपिंड व डोळे असे तीन अवयव पुण्यातील रुग्णालयात पोहचविण्यासाठी बुधवारी सकाळी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. अवघ्या सव्वा तीन तासात अवयव पोहचविण्यात यश आल्याने रुग्णाला जीवदान मिळाले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मिरजेच्या सेवासदन रुग्णालयातून एका ७५ वर्षीय मृत रुग्णाच्या नातेवाइकांच्या संमतीने यशस्वी अवयवदान करण्यात आले. यकृत, मूत्रपिंड व नेत्र (कॉर्निया) यांचे संकलन करून ग्रीन कॉरिडॉरद्वारे पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात वेळेत पाठवण्यात आले.

या महत्त्वपूर्ण व जीवनदायी उपक्रमात मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. केतकी पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली भूलतज्ज्ञ डॉ. दर्शना पांडे यांच्यासह वैद्यकीय पथकाच्या अचूक व वेगवान समन्वयाने हे काम तांत्रिकदृष्ट्या यशस्वी झाले. या मोहिमेसाठी आवश्यक प्रशासकीय पाठबळही मिळाले. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी आवश्यक परवानग्या, सुरक्षा व्यवस्था व वाहतूक नियंत्रणासाठी मदत केली.

मिरजेतून अवयव घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेस मिरज ते पुणेदरम्यान ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध करून दिल्याने अवयव विनाअडथळा व गतीने पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याने एकास नवजीवन मिळाले.

एका अमूल्य जिवाच्या रक्षणासाठी योगदान दिल्याबद्दल जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य यंत्रणा व पोलिसांचे सेवासदन रुग्णालयाने आभार मानले. यामुळे अवयवदानाबाबत समाजात जागरूकता वाढेल असे मत हॉस्पिटलचे संचालक डॉ. रविकांत पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Healthआरोग्यPuneपुणेdoctorडॉक्टरSangliसांगली