शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Organ Donation : पुण्यात वर्षभरात ७० मृत अवयव दान तर १८१ जणांचे वाचले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 15:56 IST

पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीची माहिती

पुणे : पुण्यात वर्षभरात ७० मृत अवयवदानाची नोंद केली असून २०१८ आणि २०१९ मध्ये केलेल्या ६३ अवयवदानाचा विक्रम मोडीत काढला असल्याची माहिती पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने दिली आहे. मागील २० वर्षात समिती स्थापन झाल्यापासून आतापर्यंत या केंद्राने एकूण ५५७ देणग्या दिल्या असून १,३५५ जणांचे प्राण वाचले आहेत.अवयव प्रत्यारोपण कामगिरीला मोलाचा हातभार लावला तो सरकारी रुग्णालयांनी. सार्वजनिक आरोग्य सुविधांद्वारे सात अवयव दान करण्यात आले आहे. त्यात ससून रुग्णालयातील एक आणि कमांड हॉस्पिटलमधील सहा अवयव दानांचा समावेश आहे. यावरून अवयवदानाला पाठिंबा देण्याबाबत सार्वजनिक क्षेत्रातील वाढती जागरूकता आणि बांधिलकी दिसून येत आहे. संस्थेच्या स्थापनेपासून ग्रीन कॉरिडॉर सारखे उपक्रम राबविले जात आहे. ज्यामुळे अवयवांची जलद वाहतूक शक्य होते आणि लोकांचे प्राण वाचविले जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात अवयव दान करण्यासाठी जागरुकता निर्माण होत आहे.यावर्षी विविध क्षेत्रातील नागरिकांनी आपले अवयव दान करण्यासाठी पाऊल पुढे टाकले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात चित्रपट,निर्माते, पत्रकार, वैद्यकीय, वैमानिक आणि उद्योजकांचा समावेश आहे. यातून त्यांची समाजाप्रती बांधिलकी असल्याचे दिसून आले आहे. पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने अवयव प्रत्यारोपणाच्या प्रयत्नांमध्ये सातत्याने नवनवीन संशोधन करत नागरिकांच्या हिताचा विचार केला आहे. त्यामुळेच २० वर्षात ५५७ मृत अवयवांच्या मदतीने १,३५५ नागरिकांचे प्राण वाचविण्यात यश मिळवता आले आहे.विभागीय प्रत्यारोपण समितीला पुण्यात वर्षभरात ७० मृत अवयव प्राप्त झाले असून पुणे परिमंडळातील प्रत्यारोपण केलेल्या अवयवांची संख्या १८१ आहे. यामध्ये मूत्रपिंड ९३, यकृत ५८, हृदय ६, मूत्रपिंड आणि स्वादुपिंड ४, हृदय आणि फुफ्फुस १, १४ फुफ्फुसे अवयवांचा समावेश आहे. 

झेडटीसीसी पुणे डॉक्टर आणि समन्वयकांचे त्यांच्या अढळ समर्पणाबद्दल मनःपूर्वक आभार मानतो. दु:खाचे समुपदेशन करत अवयव दान करणाऱ्या कुटुंबांना आधार देण्यासाठी त्यांनी केलेल्या दयाळू प्रयत्नांमुळे दु:खाचे आशेत रूपांतर झाले असून, अवयवदानाचे कार्य अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत बनले आहे. अशा प्रेरणादायी निर्णयामुळे १८१ जणांचे प्राण वाचविण्यात यश मिळाले आहे.  - ए.जी. हुपरीकर, अध्यक्ष, झेडटीसीसी, पुणे

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रOrgan donationअवयव दानHealthआरोग्यdoctorडॉक्टर