शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

एअर फोर्स स्टेशनजवळील बांधकामे पाडण्याचे आदेश

By admin | Updated: June 9, 2015 03:13 IST

पुण्यातील लोहगाव येथील एअर फोर्स स्टेशनजवळ सन २००३ नंतर उभारलेली बांधकामे पाडा, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी पुणे महापालिकेला दिले.

मुंबई : मुंबई व गुजरात समुद्रातील तेल कंपन्यांचे उत्पादन स्त्रोत(आॅईल रिग), भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर(ट्रॉम्बे), खडकी येथील शस्त्र निर्मिती कारखाना, खडकवास येथील राष्ट्रीय सुरक्षा प्रशिक्षण केंद्र यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करणाऱ्या पुण्यातील लोहगाव येथील एअर फोर्स स्टेशनजवळ सन २००३ नंतर उभारलेली बांधकामे पाडा, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी पुणे महापालिकेला दिले.महापालिका आयुक्त व मुख्य शहर अभियंता यांना न्या. अभय ओक व न्या. ए. के. मेनन यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. उभयंतांनी येत्या सहा महिन्यात या स्टेशनच्या एक हजार यार्डमध्ये ३ आॅक्टोबर २००३ नंतर उभारलेली बांधकामे निश्चित करावीत. या बांधकाम मालकांना रितसर नोटीस देऊन ही बांधकामे या तारखेनंतरच उभारली आहेत की नाहीत याची शाहनिशा करावी. त्यानंतर ही बांधकामे पाडून टाकावीत. या कारवाईसाठी न्यायालयाने पालिकेला एक वर्षाचा कालावधी दिला आहे.मंजीरदरजीत सिंग व राम महादेव थोरात यांनी यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. एअर फोर्स स्टेशनपासून एक हजार यार्ड क्षेत्रात असलेल्या भूखंडाचा वापर करू नये. तसेच मुख्य धावपट्टीपासून ६०० मीटरपर्यंत व धावपट्टीच्या केंद्रबिंदूपासून १५० मीटरपर्यंत बांधकाम करू नये व झाडे लावू नये,यासाठी संरक्षण दलाने वेळोवेळी मार्गदशर्कतत्त्वे जारी केली आहेत. मात्र पुणे पालिका याची अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे या क्षेत्रात बांधकाम झाले आहे. याने या स्टेशनला धोका होऊ शकतो. सध्या होत असलेले दहशतवादी हल्ले लक्षात घेता येथील बांधकामे पाडावीत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. याची दखल घेत खंडपीठाने वरील आदेश दिले. या बांधकामांमुळे या स्टेशनला धोका होऊ शकतो व हे नागरिकांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे जनहितार्थ हे बांधकाम पाडणे आवश्यक असेल्याने नमूद केले आहे.नागरिकांनाही धोकाया बांधकामांमुळे या स्टेशनला धोका होऊ शकतो व हे नागरिकांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे जनहितार्थ हे बांधकाम पाडणे आवश्यक आहे. मात्र संरक्षण दलाने जारी केलेल्या काही मार्गदर्शकतत्त्वांचे नुतनीकरण न झाल्याने त्याची वैधता संपली आहे. तेव्हा ही याचिका दाखल झाल्यापासून म्हणजेच ३ आॅक्टोबर २००३ नंतर या स्टेशनजवळ उभारलेली बांधकामे पालिकेने पाडावीत. यासाठी एअर फोर्स अधिकाऱ्यांनीही मदत करावी, असे आदेश न्यायालयाने दिले.